• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • न्यूझीलंडने रद्द केला पाकिस्तान दौरा, पण बिर्याणीचं बिल 27 लाख रुपये! पाहा कोणी मारला ताव

न्यूझीलंडने रद्द केला पाकिस्तान दौरा, पण बिर्याणीचं बिल 27 लाख रुपये! पाहा कोणी मारला ताव

न्यूझीलंडने पहिल्या वनडेच्या काही मिनिटं आधी पाकिस्तान दौरा रद्द (New Zealand Cancels Pakistan Tour) केला. हा दौरा रद्द झाला असला तरी पाकिस्तानला बिर्याणीचं (Biryani Bill) 27 लाख रुपयांचं बिल आलं आहे.

 • Share this:
  इस्लामाबाद, 23 सप्टेंबर : पाकिस्तानमध्ये कोणतीही परदेशी टीम खेळायला जाण्याआधी 10 वेळा विचार करते. श्रीलंकेच्या टीमवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक टीम पाकिस्तान दौऱ्यावर जायला तयार होत नाहीत. काहीच दिवसांपूर्वी न्यूझीलंडने पहिल्या वनडेच्या काही मिनिटं आधी पाकिस्तान दौरा रद्द (New Zealand Cancels Pakistan Tour) केला, यानंतर आता इंग्लंडच्या टीमनेही पाकिस्तानला (England Cancels Pakistan Tour) जायला नकार दिला, त्यामुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढावली. आधीच आर्थिक अडचणीत असलेलं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड दोन टीमनी दौरे रद्द केल्यामुळे आणखी अडचणीत सापडलं. हे कमी की काय, आता पुन्हा एकदा पाकिस्तानचं हसं झालं आहे. अजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द होण्याबद्दल लावलं महाराष्ट्र कनेक्शन! न्यूझीलंड दौरा रद्द झाला असला तरी या दौऱ्यासाठी 27 लाख रुपयांचं बिर्याणीचं (Biryani Bill) बिल आहे. न्यूझीलंडच्या टीमला सुरक्षा देणाऱ्या पोलिसांनी ही बिर्याणी खाल्ल्याचं वृत्त पाकिस्तानी वेबसाईटने दिलं आहे. न्यूझीलंड टीमला 8 दिवस सुरक्षा देण्यासाठी पोलिसांची संपूर्ण टीम होती. न्यूझीलंडची टीम इस्लामाबादच्या सेरेना हॉटेलमध्ये थांबली होती, यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या इस्लामाबाद पोलिसांनी 27 लाख रुपयांची बिर्याणी खाल्ली. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी 5 एसपी आणि अनेक एसएसपी होते. या सगळ्यांनी मिळून 27 लाख रुपयांच्या बिर्याणीवर ताव मारला. T20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा! न्यूझीलंडची टीम इस्लामाबदच्या सेरेना हॉटेलमध्ये थांबली होती. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी इस्लामाबाद कॅपिटल टेरेटरी पोलिसांचे 500 पोलीस तैनात होते. पोलिसांच्या आठ दिवसाच्या जेवणाचा खर्च 27 लाख रुपये झाला. पोलीस दिवसातून 2 वेळा भरपेट जेवत होते, ज्यात बिर्याणी सर्वाधिक वेळा मागवण्यात आली. अर्थ विभागाकडे जेव्हा ही बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी नेण्यात आली, तेव्हा याचा खुलासा झाला. T20 World Cup : सगळ्यात मोठा सामना भारताविरुद्ध नाही, तर... शोएब अख्तरची या टीमला 'धमकी'
  Published by:Shreyas
  First published: