मुंबई, 21 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपला 17 ऑक्टोबरपासून (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कपचा सगळ्यात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला होणार आहे. पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याला मात्र हा सामना सगळ्यात मोठा वाटत नाही. शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे, यात त्याने संताप व्यक्त केला.
न्यूझीलंडच्या टीमने शेवटच्या क्षणी पाकिस्तान दौरा (New Zealand Cancels Pakistan Tour) खेळायला नकार दिला. सुरक्षेच्या कारणामुळे न्यूझीलंड टीमने पहिल्या वनडेच्या टॉसआधीच दौऱ्यातून माघार घेतली. यानंतर आता इंग्लंडनेही 2 टी-20 मॅचसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जायला नकार दिला आहे. न्यूझीलंड टीमच्या निर्णयामुळे इंग्लंडने (England Cancels Pakistan Tour) हे पाऊल उचलल्याचा आरोप शोएब अख्तरने केला आहे. एवढच नाही तर त्याने न्यूझीलंड टीमला धमकीही दिली आहे.
So England also refuses. Its ok guys, see you all at the T20 World Cup. Specially @BLACKCAPS. Ab painja laganay ka time aa gaya hai. Chorna nahi hai ab @babarazam . Full video: https://t.co/zUwpaHDvzb pic.twitter.com/PxMb1Bt5bb
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) September 20, 2021
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना भारताविरुद्ध (India vs Pakistan) आहे, पण यापेक्षा मोठा मुकाबला 26 ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध (Pakistan vs New Zealand) होणार आहे. या मॅचमध्ये आपल्याला बदला घेतला पाहिजे. संपूर्ण राग मैदानात काढला पाहिजे. या काळात पाकिस्तानने सगळं लक्ष यावरच केंद्रीत केलं पाहिजे. सगळ्यात आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला टीम निवड नीट करावी लागेल. टीममध्ये 3-4 चांगल्या मुलांना संधी द्यावी लागेल, तरच पाकिस्तानची टीम मजबूत होईल. पाकिस्तान क्रिकेटने यापेक्षा वाईट काळ बघितला आहे, आपण नक्कीच यातून वर येऊ, असं शोएब अख्तर त्याच्या युट्यूब व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
पाकिस्तानचा दौरा रद्द केल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या सरावासाठी आम्ही पाकिस्तान दौऱ्याला तयार झालो होतो. सोबतच इंग्लंडची महिला टीमही पाकिस्तान दौऱ्यावर जाणार होती, पण सध्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची मानसिक आणि शारिरिक आरोग्य आमची प्राथमिकता आहे. पाकिस्तानला गेल्यामुळे खेळाडूंवर दबाव वाढेल. खेळाडू आधीपासूनच कोरोनामुळे त्रासलेले आहेत. या परिस्थितीमध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी ही तयारी चांगली नसेल, असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, New zealand, Shoaib akhtar, T20 world cup