मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द होण्याबद्दल लावलं महाराष्ट्र कनेक्शन!

अजब पाकिस्तानचा गजब दावा, न्यूझीलंड सीरिज रद्द होण्याबद्दल लावलं महाराष्ट्र कनेक्शन!

भारतामुळेच इंग्लंड आणि न्यूझीलंडने (New Zealand and England Pakistan Tour) पाकिस्तानचा दौरा रद्द केल्याचा दावा पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी महाराष्ट्र कनेक्शनही (Maharashtra Connection) जोडलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 22 सप्टेंबर : न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा (New Zealand Cancels Pakistan Tour) दौरा पहिल्या वनडेआधी काही मिनिटं रद्द केला. सुरक्षेचं कारण देत न्यूझीलंडने या दौऱ्यातून माघार घेतली, यानंतर इंग्लंडच्या टीमनेही पाकिस्तानला (England Cancels Pakistan Tour) जायला नकार दिला. याप्रकरणी पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी रडीचा डाव खेळला आहे. याप्रकरणी फवाद चौधरी यांनी भारतावर आरोप केले आहेत. न्यूझीलंड क्रिकेट टीमला धमकीचा ई-मेल भारतातून आला आहे, असा दावा फवाद चौधरी (Fawad Chaudhary) यांनी केला आहे.

पाकिस्तानमधल्या गेल्या काही काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात आहे, असा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताने पाकिस्तानचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचं रोखठोक प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच तुमच्या भूमीत असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी भारताने इस्लामाबादकडे केली.

'ऑगस्ट महिन्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा दहशतवादी एहसानुल्लाह एहसनच्या नावावर एक फर्जी पोस्ट तयार करण्यात आली, यामध्ये न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला आणि सरकारला आपल्या टीमला पाकिस्तानला पाठवलं तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल, असं सांगण्यात आलं, तरी न्यूझीलंडची टीम पाकिस्तानमध्ये आली. पण मॅचच्या काही तास आधी त्यांनी दौरा रद्द केला,' असं चौधरी म्हणाले.

T20 World Cup : भारतच नाही, या दोन टीमही निशाण्यावर, पाकिस्तानचा इशारा!

'पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी, गृह मंत्रालयाची सुरक्षा टीम आणि प्रत्येकाने या धमकीबाबत माहिती द्या, असं न्यूझीलंडला सांगितलं, पण याबाबत त्यांनाही काही माहिती नव्हती. एका दिवसानंतर न्यूझीलंड टीमला आणखी एक धमकीचा मेल करण्यात आला. यामध्ये हम्जा आफ्रिदी नावाच्या आयडीचा वापर करण्यात आला. हा मेल भारतातल्या डिव्हाईसवरून पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांच्या तपासात समोर आलं आहे,' असा दावा चौधरींनी केला.

'हा मेल व्हीपीएनवरून पाठवण्यात आला, ज्यात याची जागा सिंगापूर दाखवण्यात आली. या डिव्हाईसवर आणखी 13 आयडी होते, यातले बहुतेक आयडी भारतातले होते. न्यूझीलंड टीमला जी धमकी मिळाली, त्यासाठी भारतातल्या डिव्हाईसचा वापर केला गेला. एक फर्जी आयडीचा वापर केला गेला, जो महाराष्ट्रातून (Maharashtra Connection) पाठवण्यात आला,' असं फवाद चौधरी म्हणाले.

T20 World Cup : सगळ्यात मोठा सामना भारताविरुद्ध नाही, तर... शोएब अख्तरची या टीमला 'धमकी'

'पाकिस्तानचा दौरा रद्द करणं दुर्दैवी आहे. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटविरुद्ध अभियान आहे. आयसीसी आणि अन्य संस्थांनी यावर लक्ष देणं गरजेचं आहे. जर सरकारला कोणतीही आपत्ती नसताना इंग्लंड क्रिकेट बोर्ड कोण आहे, दौरा रद्द करणारं? खेळाडू थकले आहेत, हे कारण सांगणं चुकीचं आहे,' अशी टीका फवाद चौधरी यांनी केली. तसंच परवानगी मिळाली तर आम्ही इंग्लंड क्रिकेट बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही चौधरींनी दिला.

First published:

Tags: Pakistan