Home /News /sport /

IPL2022: KL Rahul च्या चाहत्याने क्रॉस केली लिमेट, सुनील शेट्टीने दिले सडेतोड उत्तर

IPL2022: KL Rahul च्या चाहत्याने क्रॉस केली लिमेट, सुनील शेट्टीने दिले सडेतोड उत्तर

शतक झळकावल्यानंतर क्रिकेट जगतातून राहुलवरा शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच कथिक गर्लफ्रेंड अथिया शेट्टीचे वडील म्हणजे अभिनेत सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांना राहुलच्या शतकी खेळीवरुन ट्रोल करण्यात आले. मात्र, त्या ट्रोर्लंना सडेतोड उत्तर देत शेट्टीने चांगलेच सुनावले.

पुढे वाचा ...
  मुंबई, 18 एप्रिल: सध्या आयपीएलचा थरार रंगला आहे. अशातच मुंबई आणि लखनऊ यांच्यात (LSGvsMI) आयपीएल 15 व्या सीझनमधील 23 वा सामना खेळवण्यात आला. या लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार के एल राहुलने (KL Rahul ) आपल्या 100 व्या आयपीएल सामन्यात शतक झळकावले. हे शतक झळकावल्यानंतर क्रिकेट जगतातून राहुलवरा शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. अशातच कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टीचे वडील म्हणजे अभिनेत सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांना राहुलच्या शतकी खेळीवरुन ट्रोल करण्यात आले. मात्र, त्या ट्रोर्लंना सडेतोड उत्तर देत शेट्टीने चांगलेच सुनावले. नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आपल्या कर्णधाराचा निर्णय खरा ठरवण्यात मुंबईच्या संघाला अपयश आले. प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आहे. त्याच्या शतकी खेळीनंतर सुनिल शेट्टीने ट्विट करत खास मेसेज लिहीला. 'शांततेत कठोर परिश्रम करा आणि तुमच्या यशाला ओरडू द्या' असा मेसेज दिला.
  या पोस्टला राहुलच्या चाहत्याने कमेंट करत सुनिल शेट्टील ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण सुनिल शेट्टीनी सडेतोड उत्तर दिले. नेमकं काय घडलं? सुनिल शेट्टी यांनी राहुलसाठी केलेल्या एका पोस्ट वर चाहत्याने, मागच्या खेळादरण्यात तुम्ही तिथे होत म्हणून शून्यावर बाद झाला. यावेळी तुमच्या घरातून कोणीही आले नाही, म्हणून 100*** लावा.' अशा आशायची पोस्ट चाहत्याने सुनिल शेट्टीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनिल शेट्टी यांनी 'बेटा तु तुझ्या घरी लक्ष दे' असे म्हणत सडेतोड उत्तर दिले.सध्या या दोघांचा वाद सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. IPL 2022: गब्बरबाबत असं काही घडलं की काही मिनिटे मैदानावरच लागला लोळू के एल राहुलने (kl rahul) 57 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने हे शतक ठोकले. राहुलच्या आयपीएल कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले आहे. तो 100 व्या सामन्यात आयपीएलमध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज बनला आहे. राहुलच्या आयपीएल कारकिर्दीतील हे तिसरे शतक ठरले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants, Sunil shetty

  पुढील बातम्या