जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022: गब्बरबाबत असं काही घडलं की काही मिनिटे मैदानावरच लागला लोळू

IPL 2022: गब्बरबाबत असं काही घडलं की काही मिनिटे मैदानावरच लागला लोळू

IPL 2022: गब्बरबाबत असं काही घडलं की काही मिनिटे मैदानावरच लागला लोळू

रविवारी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) 7 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात पंजाबच्या डावात क्रिकेट जगतात गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनबाबत(Shikhar Dhawan Injured) गंभीर घटना पाहायला मिळाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 एप्रिल: रविवारी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) 7 गडी राखून सामना जिंकला. या सामन्यात पंजाबच्या डावात क्रिकेट जगतात गब्बर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनबाबत (Shikhar Dhawan Injured)गंभीर घटना पाहायला मिळाली. फलंदाजी करतेवेळी धवनच्या प्रायव्हेट पार्टला बॉल लागला आहे. त्यामुळे त्याचा मैदानावरचा लोळतेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. धवनने (Shikhar Dhawan) या सामन्यात 11 बॉलमध्ये 1 चौकारांच्या मदतीने 8 धावा केल्या. या खेळीदरम्यान हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारचा (Bhuvneshwar Kumar) एक बॉल त्याच्या प्रायव्हेट पार्टला (Ball Hit Dhawan’s Private Part) लागला. IPL 2022 : उमरान मलिकने इतिहास घडवला, शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्यांदाच झाला असा पराक्रम भुवनेश्वर पंजाबच्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकातील तिसरा चेंडू धवनने थोडा पुढे येऊन मारला आणि चौकारासाठी सीमारेषेपार गेला. त्यानंतर पुन्हा धवनने चौथ्या चेंडूवर असाच फटका मारण्याचा प्रयत्न केला. तो पुन्हा पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता. परंतु तो भुवनेश्वरचा बॅक ऑफ लेंथ बॉलला ऑन साइडवर मारण्याच्या प्रयत्नात असताना तो बॉल सरळ धवनच्या प्रायव्हेट पार्टला जाऊन लागला. त्यानंतर धवन वेदनेने मैदानावर विव्हळताना दिसला. आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सनरायजर्स हैदराबादचा (SRH vs Punjab Kings) लागोपाठ चौथा विजय झाला आहे. उमरान मलिक (Umran Malik) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)  या दोघांच्या आक्रमक बॉलिंगमुळे हैदराबादने पंजाब किंग्सचा 7 विकेटने पराभव केला आहे. पंजाब किंग्सने दिलेलं 152 रनचं आव्हान हैदराबादने 18.5 ओव्हरमध्येच पार केलं. एडन मार्करमने नाबाद 41 आणि निकोलस पूरनने नाबाद 35 रनची खेळी करत हैदराबादला जिंकवून दिलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात