नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानात होणारा सामना हा एक युद्धच असतो. वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत अंतिम सामन्यापेक्षा जास्त उत्सुकता भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची असते. आता पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा सामना बघायला मिळणार आहे. 8 मार्चपासून शारजाह क्रिकेट स्टेडियमवर टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड कप सुरू होणार आहे. 11 मार्चला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारताची सिनियर टीम आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसीची स्पर्धा वगळता गेल्या 20 वर्षांत लढत झालेली नाही. 2000 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या तिरंगी मालिकेत हे संघ खेळले ङोते. तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भारत-पाक 2013-14 मध्ये भीडले होते. दोन्ही संघ अंडर 19 आशिया कमध्येही आमने सामने आले होते. गेल्या वर्षी टेनिस बॉल क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 16 संघांनी सहभाग नोंदवला होता. मात्र यावेळी स्पर्धेत 20 संघ सहभागी होत आहेत. सर्व सामने 10-10 षटकांचे असतील. भारतीय उपखंडात असे क्रिकेट प्रसिद्ध आहे. भारत आणि पाकिस्तानमधील अनेक दिग्गजांनी टेनिस बॉल क्रिकेट खेळत कारकिर्दीला सुरुवात केली असल्याचं स्पर्धेच्या आयोजकांनी म्हटलं. टेनिस बॉल क्रिकेट भारतीय संघ : अंकुर सिंग, ओमकार देसाई, थॉमस दियास, मोइनुद्दीन शेख, कृष्णा सतपूते, उस्मान पटेल, सुमित ढेकाले, योगेश पेंकार, अजित मोहिते, दिनेश नाडकर्णी, विश्वाजीत ठाकूर, जाफर जमाल, विजय पावले, सुल्तान खान. पाकिस्तान : शिराज अहमद, जहीर कालिया, मुबशर अहमद, करीम खान, फाहिमुल्लाह शाह, वाजिद खान, इरफान, सद्दाम शाह, उस्मान पेसर, जलात खान, करना जाहिर, शेबाज अहमद, नादिर, सैयद मकसूद, समिउल्लाह. IPL 2020 : संघाने कॅप्टनसाठी नाही तर खेळाडूसाठी मोजली दुप्पट रक्कम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







