जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / धोनीसाठी IPL ही शेवटची संधी, टीम इंडियात परतण्यासाठी पूर्ण करावी लागेल ‘ही’ अट

धोनीसाठी IPL ही शेवटची संधी, टीम इंडियात परतण्यासाठी पूर्ण करावी लागेल ‘ही’ अट

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. मात्र वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का?, असा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. मात्र वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का?, असा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे.

धोनी आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळं धोनीच्या आयपीएलमधील खेळीवर त्याला टीम इंडियात पुन्हा जागा मिळेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 10 मार्च : महेंद्र सिंग धोनी गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेट खेळत नाही आहे. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का, अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र आता धोनी आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळं धोनीच्या आयपीएलमधील खेळीवर त्याला टीम इंडियात पुन्हा जागा मिळेल. याआधी माजी निवड समिती एमएसके प्रसाद यांनी धोनीला संघात परतण्यासाठी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आता धोनीच्या भविष्याबाबत नवीन निवड समितीचेही हेच मत आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली तरच धोनीची टीम भारतात परत येईल असे प्रसाद यांनी यावर्षी जानेवारीत सांगितले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन मुख्य निवडक सुनील जोशी यांचेही धोनीबद्दल असेच मत आहे. रविवारी निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बैठक घेतली तेव्हा समितीने धोनीबद्दल औपचारिक चर्चा केली नाही, परंतु आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यावरच त्याच्या नावाचा विचार केला जाईल, असा निर्णय घेतला. याआधी धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघसाठी सराव करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या हंगामासाठी धोनी सध्या चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर सराव करत आहे. हा सराव करत असताना गुरुवारी धोनीचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये धोनीनं आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत. धोनीने जबरदस्त कमबॅक करत 5 चेंडूत 5 सिक्स लगावले. वाचा- 6, 6, 6, 6, 6 : माही मार रहा है! IPLआधी धोनीची तुफान बॅटिंग, पाहा VIDEO यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी खेळाडूंच्या आय़पीएलमधील कामगिरीवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यामुळं धोनीला आपला स्ट्राइक रेट चांगला करावा लागले. याआधी वर्ल्ड कप 2019मध्ये सचिनसह अनेक दिग्गजांनी धोनीच्या स्ट्राइक रेटवर टीका केली. त्यामुळं धोनीला टी-20 वर्ल्ड कपमध्ये कमबॅक करायचा असल्यास त्याला आपली मॅच विनिंग खेळी पुन्हा करावी लागेल. वाचा- CSKचा कर्णधार नसतो तर…, कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक धोनी खेळेल तेव्हाच कमबॅक करेल याआधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही धोनी आयपीएलमध्ये चांगला खेळल्यास टी -20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये परत येऊ शकतो असे संकेत दिले होते. धोनी 8 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीनंतर त्याने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो सध्या चेन्नईमध्ये आयपीएलची तयारी करत आहे आणि 29 मार्च रोजी चेन्नई-मुंबई स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यातून तो मैदानात परतणार आहे. वाचा- IPL 2020 : फक्त धोनी नाही तर ‘हे’ दिग्गज खेळाडूही IPLमधून घेणार निवृत्ती

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket , dhoni
  • First Published :
जाहिरात
जाहिरात