Home /News /sport /

CSKचा कर्णधार नसतो तर..., कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक

CSKचा कर्णधार नसतो तर..., कमबॅकआधी ‘थाला’ धोनी झाला भावुक

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र त्याहून जास्त चाहत्यांचे लक्ष आहे ते भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कमबॅककडे.

    चेन्नई, 04 मार्च : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) तेराव्या हंगामाकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र त्याहून जास्त चाहत्यांचे लक्ष आहे ते भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या कमबॅककडे. तब्बल 9 महिन्यांनंतर धोनी क्रिकेट मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळण्याआधी धोनीनं सरावाला सुरुवात केली आहे. याआधी धोनीच्या सरावाचे आणि स्वागताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयपीएलमधून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्याची तयारी करीत असलेल्या धोनीने आपल्या संघाचे आणि फॅनचे आभार मानला. धोनीनं त्याला अधिक चांगला खेळाडू बनविल्याबद्दल CSK संघाचे आभार मानत, चेन्नई संघाने मैदानाच्या आत व बाहेर असलेल्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यास मदत केल्याचे सांगितले. वाचा-VIDEO : असा शॉट विराट-धोनीलाही जमणार नाही, क्रिकेटपटूचा नवा शॉट VIRAL धोनीने गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप 2019मध्ये उपांत्य फेरीत अखेरचा सामना खेळला होता. आता धोनीने आयपीएलमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सीएसकेसमवेत पहिल्या प्रशिक्षण सत्रात जोरदार स्वागत झाले. आयपीएलचा पुढील सत्र 29 मार्चपासून सुरू होईल. वाचा-कोरोनाव्हायरसमुळे IPLवर टांगती तलवार! बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात धोनीने, 'CSKने मला सर्व काही सुधारण्यास मदत केली, मग तो मानवी पैलू असो किंवा क्रिकेटपटू, मैदानाच्या आत आणि बाहेरील कठीण प्रसंग असो. त्यांच्याशी सामना कसा करण्याच धैर्य मला या संघाने दिले”, असे सांगत आयपीएलचेही आभार मानला. वाचा-IPL 2020 आधी BCCI ने घेतला मोठा निर्णय, विजेत्यांसह इतर संघांचे होणार नुकसान सीएसकेचे चाहते धोनीला 'थाला' म्हणतात आणि त्याला मिळालेले प्रेम आणि आदर विशेष असल्याचेही मत धोनीने व्यक्त केले. धोनीने यावेळी, 'खरं तर थाला म्हणजे भाऊ, चाहत्यांनी मला दिलेले प्रेम हे अविश्वसनीय आहे', असे सांगत भावुक झाला. चेन्नई संघाचा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. याआधी आयपीएल 2019मध्ये अंतिम सामन्यात चेन्नईला मुंबईने 1 धावाने नमवले होते. त्यामुळं या पराभवाचा बदला घेण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरणार. याचबरोबर धोनीच्या चाहत्यांसाठी त्याला पुन्हा फलंदाजी करताना पाहण्याची संधी मिळणार आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: CSK, IPL 2020, MS Dhoni

    पुढील बातम्या