अॅडलेड, 10 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपच्या मैदानात आज टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर रोहित शर्मा आपल्या चेहऱ्यावरची निराशा लपवू शकला नाही. हरल्यानंतर बराच वेळ तो डग आऊटमध्ये राहुल द्रविडच्या बाजूला बसून होता. पण या मॅचनंतर टीम इंडियाचा एक खेळाडू मात्र सोशल मीडियात भरपूर ट्रोल होतोय. भारतीय संघाच्या खराब कामगिरीला या खेळाडूला जबाबदार धरलं जातंय.
लोकेश राहुल फ्लॉप तरीही टीममध्ये टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुलनं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सुमार कामगिरी बजावली. त्याला पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि आज इंग्लंडविरुद्धही दुहेरी धावांचा आकडा गाठता आला नाही. सेमी फायनलच्या निर्णायक लढतीत तो 5 धावा काढून बाद झाला. त्याआधी पहिल्या तिन्ही मॅचमध्ये त्याच्या खात्यात फक्त 22 धावा होत्या. पण तरीही तो पुढचे सगळे सामने खेळला. त्यात त्यानं झिम्बाब्वे आणि बांगलादेश या टीमविरुद्ध अर्धशतक झळकावलं. पण टॉप टीमविरुद्ध तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. म्हणूनच सध्या क्रिकेट चाहत्यांच्या तो रडारवर आहे. हेही वाचा - Ind vs Eng: अॅडलेडमध्ये या खेळाडूंनी दिला रोहितला दगा… हेल्स-बटलरकडून टीम इंडियाचा पालापाचोळा लोकेश राहुलची टॉप टीमविरुद्ध कामगिरी (टी20 वर्ल्ड कप) 3 (8) वि. पाकिस्तान, दुबई 18 (16) वि. न्यूझीलंड, दुबई 4 (8) वि. पाकिस्तान, मेलबर्न 9 (14) वि. दक्षिण आफ्रिका, पर्थ 5 (5) वि. इंग्लंड, अॅडलेड सोशल मीडियात राहुल ट्रोल सध्या सोशल मीडियात राहुल चांगलाच ट्रोल होतोय. त्याच्यावरचे अनेक ट्विट्स सध्या व्हायरल होत आहेत.
अशा प्रकारे राहुलला कुणी चोकर तर कुणी फ्रॉड म्हटलंय. त्याच्या खराब कामगिरीचा टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राहुलवर चाहते चांगलेच नाराज आहेत.