जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कृणालच्या सापळ्यात Hardik Pandya अडकताच, पत्नी नताशाची अशी होती रिअ‍ॅक्शन

कृणालच्या सापळ्यात Hardik Pandya अडकताच, पत्नी नताशाची अशी होती रिअ‍ॅक्शन

Nataša Stanković

Nataša Stanković

आयपीएल 15 व्या सीझनमध्ये काल गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन टीम पहिल्यांदाच मॅच खेळवण्यात आली. या सामन्यात दोन भावात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. पहिल्यांदाच हार्दिक(Hardik Pandya ) आणि कृणाल (Krunal Pandya) एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. विशेष म्हणजे झालेल्या या सामन्यात कृणाल पांड्यानेच हार्दिकची विकेट घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 मार्च: आयपीएल 15 व्या सीझनमध्ये काल गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या दोन टीम पहिल्यांदाच मॅच खेळवण्यात आली. या सामन्यात दोन भावात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. पहिल्यांदाच हार्दिक(Hardik Pandya ) आणि कृणाल (Krunal Pandya) एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. विशेष म्हणजे झालेल्या या सामन्यात कृणाल पांड्यानेच हार्दिकची विकेट घेतली. भावाने भावाची विकेट घेताच हार्दिकची पत्नी नताशाने (Nataša Stanković ) दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल होत आहे. कृणालने फ्लाईट दिलेल्या बॉलवर हार्दिक मोठा शॉट मारायला गेला, पण बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या मनिष पांडेने कॅच पकडला. कृणाल पांड्याने या सामन्यात हार्दिक पांड्याची विकेट घेतली. कृणालने रचलेल्या सापळ्यामध्ये हार्दिक अडकला आणि स्वत:ची विकेट गमावून बसला. त्यानंतर कृणाल आणि हार्दिकची पत्नी या दोघांची रिअ‍ॅक्शन कॅमेराच कैद झाली आहे. त्यांच्या दोघांच्या रिअ‍ॅक्शनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जाहिरात

हार्दिक पांड्या 28 बॉलमध्ये 33 रन करून आऊट झाला. स्वतःच्याच हातून भावाला आऊट केल्याने कृणालने चेहऱ्यावर हात घेतला तर हार्दिकची पत्नी नताशाने कपाळावर हात मारला. पांड्या ब्रदर्स अर्थात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पंड्या (Krunal Pandya)ज्यांनी आयपीएलमधून क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवला आहे, हे दोघे भाऊ देखील पहिल्यांदाच आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळताना दिसले. पंड्या ब्रदर्स त्यांच्या आयपीएल पदार्पणापासूनच मुंबई इंडियन्सचा भाग होते परंतु त्यानंतर मुंबईने त्या दोघांमधील एकालीही रिटेन केले नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात