नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुलला फॉर्ममध्ये असूनही न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत संघात जागा देण्यात आली नव्हती. मात्र आता केएल राहुल पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. राहुल न्यूझीलंडविरुद्ध कसोटी संघात नाही तर रणजी ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये खेळताना दिसणार आहे. कर्नाटकच्या संघानं सेमीफायनल सामन्यात खेळण्यासाठी केएल राहुलची निवड केली आहे. त्यामुळं कर्नाटक संघाच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
वाचा-विराटसाठी आनंदाची बातमी! 6 महिन्यांनंतर स्टार क्रिकेटपटू करणार कमबॅक
शानदार फॉर्ममध्ये आहे राहुल
केएल राहुल सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंड दौऱ्यात झालेल्या टी-20 आणि एकगदिवसीय मालिकेत त्यानं चांगली कामगिरी केली. एकदिवसीय मालिकेत केएलनं 102च्या सरासरीनं 3 सामन्यात 204 धावा केल्या, यात एका अर्धशतकाचा समावेश होता. तर, टी-20 मालिकेत राहुलला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. त्यानं 5 सामन्यात 56च्या सरासरीनं 224 धावा केल्या, यात 2 अर्धशतकांचा समावेश होता. असे असूनही राहुलला कसोटी संघात जागा मिळाली नाही.
वाचा-‘आम्ही मॅच जिंकलो असतो पण....’, या खेळाडूंवर विराटनं फोडले पराभवाचे खापर!
सेमीफायनलसाठी कर्नाटकचा संघ- करुण नायर, आर समर्थ, देवदत्त पड्डीकल, मनीष पांडे, केएल राहुल, शरत श्रीनिवास, श्रेयस गोपाल, कृष्णप्पा गौतम, अभिमन्यु मिथुन, केवी सिद्धार्थ, प्रसिद्ध कृष्णा, जे सुचित, प्रतीक जैन, रॉनित मोरे और बीआर शरत.
वाचा-कसोटी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला पराभ, गुणतालिकेत झाले मोठे बदल
जम्मू-काश्मीरला नमवत सेमीफायनलमध्ये एन्ट्री
अष्टपैलू कृष्णप्पा गौतम च्या (K Gowtham) फिरकी गोलंदाजीने कर्नाटकने रणजी करंडक उपांत्य फेरीच्या पाचव्या दिवशी जम्मू-काश्मीरवर 163 धावांच्या दुसर्या डावात 167 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. जम्मू-काश्मीरला विजयासाठी 331 धावांचे लक्ष्य ठेवले होते पण गौतमने 18.4 षटकांत 54 धावा देत सात विकेट्स घेतल्या. त्यामुळँ कर्नाटकचा विजय निश्चित केला. जम्मू-काश्मीरची संपूर्ण टीम दुसर्या डावात 44.4 षटकांत 163 धावांवर बाद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.