लाजीरवाण्या पराभवानंतर विराटसाठी आनंदाची बातमी! 6 महिन्यांनंतर स्टार क्रिकेटपटू करणार कमबॅक

लाजीरवाण्या पराभवानंतर विराटसाठी आनंदाची बातमी! 6 महिन्यांनंतर स्टार क्रिकेटपटू करणार कमबॅक

सहा महिन्यानंतर अखेर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू या संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेनंतर पहिल्या कसोटी सामन्यातही लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळं विराटच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न विचारले जात आहे. मात्र या सगळ्यात विराटला दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या मैदानात उतरण्यासाठी जवळजवळ सज्ज झाला आहे.

पाच-सहा महिन्यांपासून पाठीच्या दुखापतीमुळे पांड्या संघाबाहेर होता. लंडनमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्याला बराच काळ मैदानापासून दूर राहावे लागले. मात्र आता पांड्या पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 26 वर्षीय पांड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्यापूर्वी घरगुती स्पर्धेत दिसणार आहे. बातमीनुसार, पांड्या मुंबईच्या डीवाय पाटील टी -20 स्पर्धेत रिलायन्स संघाकडून खेळणार आहे. 24 फेब्रुवारीपासून डीवाय वाय पाटील स्टेडियमवर ही स्पर्धा सुरू होईल. पांड्याचा संघ 25 फेब्रुवारीला रिलायन्स लीग टप्प्यात पहिला सामना, दुसरा फेब्रुवारी 28 आणि तिसरा सामना 3 मार्च रोजी खेळेल.

वाचा-‘आम्ही मॅच जिंकलो असतो पण....’, या खेळाडूंवर विराटनं फोडले पराभवाचे खापर!

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स वन संघाच्या लिस्टमध्ये पांड्याच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. हार्दिक पांड्याने 22 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात 12 ते 18 मार्चदरम्यान एकदिवसीय मालिका होणार आहे. त्यामुळं निवड समितीचे प्रमुख हार्दिक पांड्याची फिटनेस पाहण्यासाठी मैदानात जाऊ शकतात. त्यानंतर हार्दिकला संघात जागा मिळेल की नाही हे ठरवले जाईल.

वाचा-‘मोदी सत्तेत असेपर्यंत भारत-पाक सामना नाही’, क्रिकेटपटूचे धक्कादायक वक्तव्य

6 महिने क्रिकेटपासून दूर आहे पांड्या

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी -20 सामन्यात 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडूला पाठीला दुखापत झाली होती. टी -20 वर्ल्ड कप लक्षात घेता बीसीसीआयने पंड्याला शस्त्रक्रियेसाठी लंडनला पाठविले. शस्त्रक्रियेनंतर न्यूझीलंड दौऱ्यात त्याचा संघात समावेश होईल अशी अपेक्षा होती. असे झाले नसले तरी त्याची निवड न्यूझीलंडच्या भारत अ दौर्‍यासाठी झाली, परंतु वरिष्ठ संघात नाही. मात्र, नंतर मॅच फिटनेस नसल्यामुळे त्याला संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर पांड्या पुन्हा एकदा लंडनला गेला आणि तेव्हापासून एनसीएमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली आहे. हार्दिक पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त झाला पाहिजे आणि लवकरच संघात परतला पाहिजे अशी भारतीय संघाची इच्छा आहे. या दौर्‍यावर न्यूझीलंडविरूद्ध संघात अष्टपैलू अभाव होता. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी पंड्या तंदुरुस्त असावा आणि चांगल्या फॉर्ममध्ये संघात स्थान मिळावे अशी भारतीय संघाची इच्छा आहे.

वाचा-फक्त विराटच नाही तर ‘हे’ 3 स्टार भारतीय खेळाडूही आहेत निवृत्तीच्या विचारात!

First published: February 24, 2020, 1:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading