IND vs NZ : ‘आम्ही मॅच जिंकलो असतो पण....’, या खेळाडूंवर विराटनं फोडले पराभवाचे खापर!

IND vs NZ : ‘आम्ही मॅच जिंकलो असतो पण....’, या खेळाडूंवर विराटनं फोडले पराभवाचे खापर!

एकदिवसीय मालिकेत 0-3नं पराभव स्वीकारल्यानंतर कसोटीत भारतीय संघ कमबॅक करेल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही, वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात भारताला 10 विकेटनं पराभव सहन करावा लागला.

  • Share this:

वेलिंग्टन, 24 फेब्रुवारी : एकदिवसीय मालिकेत 0-3नं पराभव स्वीकारल्यानंतर कसोटीत भारतीय संघ कमबॅक करेल असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही, वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात भारताला 10 विकेटनं पराभव सहन करावा लागला. या सामन्यात भारताच्या फलंदाजांपासून क्षेत्ररक्षणापर्य़ंत सर्व खेळाडूंनी सुमार दर्जाची कामगिरी केली. सामन्यानंतर विराटनं पराभवाची खरी कारणे सांगितले.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज ढेर

कोहलीने सामन्यानंतर सांगितले की, संघातील प्रमुख फलंदाज फ्लॉप झाले आणि न्यूझीलंडचे तळाचे फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळं भारताचा पराभव झाला. कोहली म्हणाला की, मयंक आणि रहाणे यांनी चांगली फलंदाजी केली. त्याव्यतिरिक्त इतर फलंजांना चांगली कामगिरी करता आली नाही. यावेळी कोहली म्हणाला की, 'आम्ही फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलो नाही. जर आपण 220-230 बनवू शकलो असतो आणि तीन विकेट्स स्वस्तात विकत घेऊ शकलो असतो तर कदाचित त्याचा परिणाम काहीतरी वेगळाच झाला असता

वाचा-विराटपासून अश्विनपर्यंत सर्व झाले फेल! ही आहेत भारताच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे

न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांची पलटला सामना

कोहलीनं फलंदाजांवर टीका केली असली तरी गोलंदाजांचे कौतुक केले. पहिल्या डावात न्यूजीलंडची 225 धावांवर सात विकेट अशी अवस्था होती. मात्र तळाच्या तीन फलंदाजांनी 123 धावा केल्या. त्यामुळं भारताच्या हातातून सामना निसटला. मात्र यावेळी कोहली असंही म्हणाला की, “याचा अर्थ असा नाही की गोलंदाज अयशस्वी ठरले, आंतरराष्ट्रीय स्थरावर काहीही होऊ शकते”. भारताकडून इशांत शर्मानं सर्वात जास्त 5 विकेट घेतल्या.

वाचा-कसोटी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला पराभ, गुणतालिकेत झाले मोठे बदल

कोहलीने पृथ्वी शॉचा बचाव केला

दोन्ही डावांमध्ये फ्लॉप झालेल्या पृथ्वी शॉचा बचाव करताना कोहली म्हणाला, 'पृथ्वीने घराबाहेर दोनच सामने खेळले आहेत. तो एक चांगला खेळाडू आहे आणि धावा करण्यासाठी एक मार्ग सापडेल. मयंकने दोन्ही डावात चांगला खेळ केला. तो आणि रहाणे असे फलंदाज आहेत जे थोड्याच वेळात लय मिळवू शकतात”. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत आता 0-1 ने पिछाडीवर आहे. मालिकेचा दुसरा सामना 29 फेब्रुवारीपासून क्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे.

वाचा-Ind vs NZ: टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, न्यूझीलंडने 10 विकेटने जिंकला सामना

स्टार फलंदाजांची सुमार कामगिरी

भारताचा कसोटी संघ हा विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर जास्त निर्भर आहे. मात्र या कसोटी सामन्यात दोन्ही फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. कोहलीनं पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 19 धावा केल्या. तर, पुजारानं दोन्ही डावात 11 धावा करत बाद झाला.

First published: February 24, 2020, 11:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading