Home /News /sport /

विराटने केला फेव्हरेट खेळाडूचा पत्ता कट! फॉर्ममध्ये असतानाच न्यूझीलंड दौऱ्यातून काढलं बाहेर

विराटने केला फेव्हरेट खेळाडूचा पत्ता कट! फॉर्ममध्ये असतानाच न्यूझीलंड दौऱ्यातून काढलं बाहेर

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात टीम इंडियाने एक मोठा बदल केला आहे, जो संघाला महागात पडू शकतो.

    हेमिल्टन, 04 जानेवारी : न्यूझीलंडच्या भूमीवर 5-0ने टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता किवींना एकदिवसीय सामन्यांमध्येही दणका देण्याच्या तयारीत आहे. भारतीय संघाच्या सांघिक खेळीमुळं साऱ्या जगाचे त्यांच्याकडे लक्ष आहे. दरम्यान, या दौऱ्यात भारतीय संघ टी-20नंतर एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे. यासाठी आज भारतीय संघाची घोषणाही करण्यात आली. यात टीम इंडियाने एक मोठा बदल केला आहे, जो संघाला महागात पडू शकतो. भारत-न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. याआधीच रोहित शर्माने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. रोहितच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. मात्र केएल राहुलला कसोटी मालिकेत संघात जागा देण्यात आलेली नाही. भारतीय संघाचा हा निर्णय सर्वांनाच चकित करणारा होता. टी-20 मालिकेत भारताच्या विजयात केएल राहुलचा मोलाचा वाटा होता. त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला. मात्र त्यानंतरही कसोटी मालिकेत त्याला संघात जागा मिळाली नाही. वाचा-जागा एक दावेदार तीन! रोहितच्या जागी 'या' खेळाडूला विराट देणार संधी न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत राहुलने सर्वाधिक 224 धावा केल्या. केएल राहुलची फलंदाजीची 5 सामन्यांमध्ये सरासरी 56 होती आणि त्याचा स्ट्राइक रेटही 144.51 होता, पण एवढी उत्कृष्ट कामगिरी करूनही केएल राहुलवर अन्याय झाला. वाचा-वनडे मालिकेआधीच न्यूझीलंडला सर्वात मोठा झटका! कर्णधार केन विल्यम्सन संघाबाहेर केएल राहुलवर अन्याय? रोहित शर्माने दुखापतीमुळे न्यूझीलंड दौरा सोडला त्यामुळे कसोटी संघात त्याचे स्थान कोणाला मिळणार असा प्रश्न पडला. केएल राहुलने गेल्या एक वर्षापासून एकदिवसीय आणि टी -20 मालिकेत चमकदार कामगिरी केली होती आणि न्यूझीलंड टी -20 मालिकेतही त्याच्या फलंदाजीमुळे तो कसोटी संघात पुनरागमन करत असल्याचे दिसत आहे. मात्र, विराटने शुभमन गिलला निवडले. शुबमन गिलही फॉर्मात आहे आणि न्यूझीलंड ए विरुद्ध त्याने शानदार द्विशतक झळकावले आहे, परंतु राहुलने गेल्या एक वर्षात ज्या प्रकारचा खेळ आहे, तो पाहता त्याला संघात जागा मिळेल असे वाटत होते. वाचा-न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केएल राहुलचे योगदान केएल राहुलने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीज दौर्‍यात शेवटचा कसोटी सामना खेळला. त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. मात्र, एकदिवसीय आणि टी -20 स्वरूपात त्याने आपले स्थान कायम राखले आणि उत्तम प्रदर्शनही केले. गेल्या एका वर्षात केएल राहुलने 16 एकदिवसीय सामन्यात 47.86 च्या सरासरीने 718 धावा केल्या असून यात दोन शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. केएल राहुलने 2019च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 45.12च्या सरासरीने 316 धावा केल्या. वेस्ट इंडीज वन डे मालिकेत त्याने 61.66 च्या सरासरीने 185 धावा केल्या. यानंतर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत 50 च्या सरासरीने 146 धावा केल्या. वाचा-दुहेरी शतक ठोकणारे खेळाडू घेणार हिटमॅनची जागा! टीम इंडियात करणार पदार्पण विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान, यष्टीरक्षक ऋषभ पंतला दुखापत झाली, होती त्यावेळी केएल राहुलला ही जबाबदारी देण्यात आली, जी त्याने चांगली कामगिरी बजावली. केएल राहुलने राजकोट एकदिवसीय सामन्यात 2 झेल आणि शानदार स्टंप बनविला. यानंतर केएल राहुलने बेंगळुरूमध्येही 2 कॅच घेतले. असा आहे कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनिमा विहारी, ऋद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि ईशांत शर्मा
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या