Home /News /sport /

दुहेरी शतक ठोकणारे खेळाडू घेणार हिटमॅनची जागा! टीम इंडियात करणार पदार्पण

दुहेरी शतक ठोकणारे खेळाडू घेणार हिटमॅनची जागा! टीम इंडियात करणार पदार्पण

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत महत्त्वाची भुमिका बजावणारा रोहित शर्मा एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून दुखापतींमुळे बाहेर पडला आहे.

    नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत महत्त्वाची भुमिका बजावणारा रोहित शर्मा एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून दुखापतींमुळे बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यावेळी फलंदाजी करताना पायाचे स्नायू दुखावल्याने तो रिटार्यड हर्ट झाला होता. त्यामुळं रोहित शर्मा काही काळ क्रिकेट खेळू शकणार नाही आहे. दरम्यान बीसीसीआयच्या वतीनं रोहितची जागा घेण्यासाठी दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या दुखापतीवर सोमवारी सिटीस्कॅन करण्यात आले आहे. दरम्यान दुखापत गंभीर असल्यामुळे रोहित शर्मा हा दौरा खेळू शकणार नाही. तर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) रोहितच्या फिटनेवर पुढील निर्णय घेतील. त्यामुळं रोहित शर्माच्या जागी एकदिवसीय मालिकेत मयंक अग्रवाल तर कसोटीमध्ये शुबमन गिलची निवड करण्यात आली आहे. वाचा-न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा वाचा-भारत-पाक महामुकाबला! वर्ल्ड कपमधील पहिली सेमीफायनल आज रंगणार शुबमन गिल आणि मयंक अग्रवालची एण्ट्री भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 फेब्रुवारीपासून एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळं या संघात रोहितच्या जागी लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्यासोहत मयंक अग्रवाल तिसरे सलामीचे फलंदाज असतील. कसोटी क्रिकेटमध्ये मयंकची खेळी शानदार राहिली आहे, मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला भारतीय संघात जास्त संधी मिळाल्या नाही आहे. त्याचबरोबर कसोटी संघात रोहितच्या अनुपस्थितीत शुबमन गिल राहुल आणि पृथ्वी शॉसह तिसरे सलामीवीर असतील. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या भारताच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये गिलने रोहित आणि राहुलसह बॅकअप सलामीवीरची भूमिका बजावली. त्याने क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंड ए विरुद्ध अनौपचारिक कसोटीत 83 धावा केल्या आणि नाबाद 204 धावा केल्या आणि वरिष्ठ संघात स्थान मिळवले. वाचा-केएल राहुलने विराट-रोहितला टाकलं मागे, आता पाकच्या फलंदाजाशी सामना वाचा-भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतूनही बाहेर मयंक आणि गिलचे जबरदस्त रेकॉर्ड मयांक अग्रवालने आतापर्यंत भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलेले नाही. भारत अ संघाकडून त्यानं चांगली कामगिरी केली आहे. मयंकने 84 सामन्यांत 49.37च्या सरासरीने 3999 धावा केल्या आहेत. यात 13 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर, शुभमन गिलनेदेखील कसोटी सामन्यात पदार्पण केलेले नाही. परंतु त्याचाही प्रथम श्रेणी क्रिकेटमधला रेकॉर्ड आश्चर्यकारक आहे. शुभमन गिलने 20 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 71.32 च्या सरासरीने 1997 धावा केल्या आहेत. गिलने प्रथम श्रेणीमध्ये 6 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या