IND vs NZ : वनडे मालिकेआधीच न्यूझीलंडला सर्वात मोठा झटका! कर्णधार केन विल्यम्सन संघाबाहेर

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन खांद्याच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे.

  • Share this:

हॅमिल्टन, 04 फेब्रुवारी : भारतीय संघाविरूद्ध टी -20 मालिकेत लाजीरवाणा पराभव मिळाल्यानंतर न्यूझीलंड संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन खांद्याच्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. केनच्या जागी मार्क चॅपमनला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचवेळी यष्टिरक्षक फलंदाज टॉम लाथमकडे संघाचे कर्णधारपद असणार आहे.

वाचा-दुहेरी शतक ठोकणारे खेळाडू घेणार हिटमॅनची जागा! टीम इंडियात करणार पदार्पण

तिसर्‍या टी -20 सामन्यात झाला होता केन जखमी

टी -20 मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना केनच्या खांद्याला दुखापत झाली होती. यानंतर, केन विल्यम्सनने मालिकेतील उर्वरित दोन सामने खेळले नाहीत आणि त्याची टीम टिम साऊदीने घेतली. विल्यम्सनच्या एक्स-रे अहवालात गंभीर काहीही उघड झाले नसले तरी आगामी कसोटी मालिका लक्षात घेऊन टीम मॅनेजमेंट त्यांच्यावर कोणताही धोका पत्करायचा नाही.

वाचा-न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

विल्यम्सनच्या जागी चॅपमनला संघात जागा

केन विल्यम्सनच्या जागी 22 वर्षीय चॅपमॅनला संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. चॅपमनने जवळपास दोन वर्षांपूर्वी न्यूझीलंडकडून अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. अलीकडे, त्याने भारत अ विरुद्ध अनधिकृत एकदिवसीय मालिका आणि कसोटी मालिकेत शतक केले.

वाचा-केएल राहुलने विराट-रोहितला टाकलं मागे, आता पाकच्या फलंदाजाशी सामना

दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार

भारतीय संघाने पाच टी -20 सामन्यांत 5-0 असा विजय मिळविला आहे, त्यानंतर विराटसेनेचा आत्मविश्वास शिगेला पोहचला आहे. आता संघाला 5 फेब्रुवारीपासून वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेचा पहिला सामना 5 फेब्रुवारी रोजी हॅमिल्टन येथे खेळला जाईल. यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 8 फेब्रुवारी रोजी ऑकलंडमध्ये खेळला जाईल आणि मालिकेचा शेवटचा सामना 11 फेब्रुवारी रोजी माउंट मॉंगाई येथे खेळला जाईल. 15 फेब्रुवारीपासून दोन्ही संघ कसोटी मालिका सुरू करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Feb 4, 2020 11:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading