हॅमिल्टन, 04 फेब्रुवारी : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा टी-20 मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला. त्यामुळं रोहित शर्मा एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळू शकणार नाही आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले आहे. असे असले तरी सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉला न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. केएल राहुलसह शॉ दुसरा सलामीवीर असू शकतो. पहिल्या वनडेच्या एक दिवस आधी कर्णधार विराट कोहलीने पृथ्वी शॉ हॅमिल्टनमध्ये पदार्पण करणार असल्याचे संकेत दिले आहेत.
पृथ्वी शॉ वनडेमध्ये करणार पदार्पण?
शिखर धवनच्या दुखापतीनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत शॉचा समावेश झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना धवन जखमी झाला. त्याचबरोबर टी -20 मालिकेत दुखापतीमुळे रोहित शर्माही या मालिकेतून बाहेर गेला आहे. कर्णधार कोहलीने कोणाला संधी देणार याबाबत विचारचे असता, “रोहित संघाचा भाग नाही हे दुर्दैव आहे. आपल्या फलंदाजीमुळे तो किती फरक पडू शकतो हे आपण सर्वांनी पाहिले आहे. आम्हाला आगामी काळात कोणतीही मोठी एकदिवसीय स्पर्धा खेळण्याची गरज नाही, अशा परिस्थितीत आम्ही त्यांना पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची पूर्ण संधी द्यायची आहे. एकदिवसीय मालिकेत पृथ्वी शॉ सलामीला उतरले, तर केएल राहुल मधल्या फळीत खेळेल. आम्हाला असे वाटते की राहुलने यष्टीरक्षक आणि मधल्या फळी फलंदाजी करावी”, असे सांगितले.
वाचा-दुहेरी शतक ठोकणारे खेळाडू घेणार हिटमॅनची जागा! टीम इंडियात करणार पदार्पण
मयंक अग्रवालची एण्ट्री
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 फेब्रुवारीपासून एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळं या संघात रोहितच्या जागी लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ यांच्यासोहत मयंक अग्रवाल तिसरे सलामीचे फलंदाज असतील. कसोटी क्रिकेटमध्ये मयंकची खेळी शानदार राहिली आहे, मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला भारतीय संघात जास्त संधी मिळाल्या नाही आहे. मयांक अग्रवालने आतापर्यंत भारताकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलेले नाही. भारत अ संघाकडून त्यानं चांगली कामगिरी केली आहे. मयंकने 84 सामन्यांत 49.37च्या सरासरीने 3999 धावा केल्या आहेत. यात 13 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
वाचा-वनडे मालिकेआधीच न्यूझीलंडला सर्वात मोठा झटका! कर्णधार केन विल्यम्सन संघाबाहेर
श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ दोघांच्या खेळीवर असणार लक्ष
श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ हे दोन्ही मुंबईकर खेळाडू टीम इंडियाकडून खेळताना दिसतील. याआधी श्रेयस अय्यरने टी-20 मालिकेत शानदार खेळी करत एकदिवसीय संघातही स्वत:चे स्थान सिद्ध केले आहे. श्रेयस अय्यरच्या रुपाने भारताचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सुटला आहे. अय्यर मधल्या फळीचा सक्षम फलंदाज म्हणून टीम इंडियासाठी मॅच विनिंग खेळाडू ठरू शकतो.
वाचा-दुहेरी शतक ठोकणारे खेळाडू घेणार हिटमॅनची जागा! टीम इंडियात करणार पदार्पण
अशी आहे एकदिवसीय मालिका
भारतीय संघाने पाच टी -20 सामन्यांत 5-0 असा विजय मिळविला आहे, त्यानंतर विराटसेनेचा आत्मविश्वास शिगेला पोहचला आहे. आता संघाला 5 फेब्रुवारीपासून वनडे मालिका खेळायची आहे. मालिकेचा पहिला सामना 5 फेब्रुवारी रोजी हॅमिल्टन येथे खेळला जाईल. यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 8 फेब्रुवारी रोजी ऑकलंडमध्ये खेळला जाईल आणि मालिकेचा शेवटचा सामना 11 फेब्रुवारी रोजी माउंट मॉंगाई येथे खेळला जाईल. 15 फेब्रुवारीपासून दोन्ही संघ कसोटी मालिका सुरू करणार आहेत.
असा आहे भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मनीष पांडे, मयंक अग्रवाल, केदार जाधव, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.