Home /News /sport /

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 महिन्यानंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 महिन्यानंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक

भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. यासाठी बीसीसीआयनं आज भारतीय संघाची घोषणा केली.

    नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : भारतानं न्यूझीलंडला टी-20 मालिकेत 5-0ने क्लिन स्वीप दिल्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. यासाठी बीसीसीआयनं आज भारतीय संघाची घोषणा केली. या संघात तब्बल 15 महिन्यांनंतर सलामीवीर पृथ्वीने (Prithvi Shaw) कमबॅक केला आहे. तर फिटनेस टेस्ट पास करण्याच्या अटीवर इशांत शर्माला संघात जागा दिली आहे. दोन्ही संघांमध्ये 21 फेब्रुवारीपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होईल. यातील पहिला सामना 21 से 25 फेब्रुवारी दरम्यान वेलिंग्टन येथे खेळला जाईल तर दुसरा सामना 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान क्राइस्टचर्च येथे खेळला जाईल. दुखापतीमुळे रोहित शर्मा कसोटी संघातून बाहेर न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यावेळी फलंदाजी करताना पायाचे स्नायू दुखावल्याने तो रिटार्यड हर्ट झाला होता. त्याने नाबाद 60 धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे भारताला मोठा धक्का बसणार आहे. भारताच्या आघाडीच्या फळीची मदार त्याच्यावर होती. न्यूझीलंडविरुद्ध 5 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. त्यात तो खेळण्याची शक्यता कमी असल्याचं केएल राहुलने सांगितलं होतं. त्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेतही रोहित खेळू शकणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे. असा आहे कसोटी संघ- विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनिमा विहारी, ऋद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि ईशांत शर्मा
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या