Home /News /sport /

पुन्हा तळपली केएल राहुलची बॅट, डेविड वॉर्नर-एबी डिविलियर्सचे तोडले रेकॉर्ड

पुन्हा तळपली केएल राहुलची बॅट, डेविड वॉर्नर-एबी डिविलियर्सचे तोडले रेकॉर्ड

kl rahul

kl rahul

लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) यांच्यात रविवारी (01 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2022 मधील 45 वा सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा लखनऊकडून केएल राहुल (KL Rahul) याने कर्णधार खेळी केली.

पुढे वाचा ...
    मुंबई, 2 मे: लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) यांच्यात रविवारी (01 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2022 मधील 45 वा सामना झाला. या सामन्यात पुन्हा एकदा लखनऊकडून केएल राहुल (KL Rahul) याने कर्णधार खेळी केली. त्याने सलामीला फलंदाजीला येत खणखणीत अर्धशतक झळकावले. यासह त्याने चालू हंगामातील आपल्या 450 धावांचा आकडा ओलांडला आहे. अशातच त्याने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर करत डेविड वॉर्नर-एबी डिविलियर्सचे रेकॉर्ड तोडले आहे. या सामन्यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 5 षटकार ठोकले. आणि त्याने 150 षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. सर्वात जलद 150 षटकार मारणारा भारतीय केएल राहुलने आयपीएलमधील 104 व्या सामन्यातील 95व्या डावात खेळताना ही कामगिरी केली. राहुलने दिल्लीविरुद्धच्या डावात पहिला षटकार मारताच त्याच्या आयपीएलमध्ये 150 षटकार पूर्ण झाले. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर आता 154 षटकार आहेत. आयपीएलमध्ये सर्वात जलद 150 षटकार मारण्यासाठी त्याने डेव्हिड वॉर्नर आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या मजबूत खेळाडूंनाही मागे टाकले. राहुलने 95व्या डावात हे स्थान गाठले, तर डेव्हिड वॉर्नर 109व्या आणि एबी डिव्हिलियर्सने 111व्या आयपीएल डावात अशी कामगिरी केली. IPL 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू IPL 2022 मध्ये राहुलची बॅट चांगलीच तळपत आहे. आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांच्या 10 डावांमध्ये राहुलने 56.37 च्या सरासरीने 451 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 2 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत 38 चौकार आणि 20 षटकार मारले आहेत. टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो जोस बटलर (566) नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तो आतापर्यंत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. या खेळीसह आयपीएल 2022 मध्ये राहुलच्या 450 धावा पूर्ण झाल्या आहेत. 10 सामने खेळताना त्याने 56.37 च्या सरासरीने 451 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 शतके आणि 2 अर्धशतके निघाली आहेत. आयपीएलमध्ये राहुलने 450 पेक्षा जास्त धावा करण्याची ही सलग पाचवी वेळ आहे. यापूर्वीच्या 4 हंगामात राहुलने 450 पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. राहुलच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने आतापर्यंत 104 सामने खेळताना 3724 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 4 शतके आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 2020 हंगामात त्याने सर्वाधिक धावांसाठी मिळणारी ऑरेंज कॅपही जिंकली होती.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Cricket, Ipl 2022, Kl rahul, Lucknow Super Giants

    पुढील बातम्या