मुंबई, 4 ऑक्टोबर: टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन रिषभ पंतनं आज 26व्या वर्षात पदार्पण केलं. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियात सध्या रिषभ पंतवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. पण याचदरम्यान त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत त्या गर्लफ्रेंड ईशा नेगीनं. ईशानं आपल्या इन्स्टाग्रामवरुन स्टोरी पोस्ट करुन रोमँटिक अंदाजात रिषभला विश केलंय. ईशा नेगीच्या या इन्स्टाग्राम स्टोरीची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. ईशा नेगीची इन्स्टा स्टोरी ईशा नेगीनं रिषभ पंतचे काही फोटो घेऊन एक व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ईशानं रोमँटिक अंदाजात लिहिलंय… हॅपी बर्थडे माय लव्ह.
रिषभ-ईशाची लव्ह स्टोरी 2019 साली रिषभ पंतनं ईशा नेगीसोबतच्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली होती. त्यानं इन्स्टाग्रामवरुनच दोघांचा फोटो शेअर केला होता. जानेवारी 2019 च्या त्या पोस्टमध्ये रिषभनं लिहिलं होतं की… ‘त्याला नेहमी ईशाला खुश ठेवायचं आहे…कारण त्याच्या आनंदाचं कारणंही तीच आहे.’ तोच फोटो ईशानंही त्यानंतर सोशल मीडियात शेअर केला होता. मिळालेल्या माहितीनुसार ईशा आणि रिषभ पंत 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत.
कोण आहे ईशा नेगी? ईशा नेगी हीदेखील मूळची उत्तराखंडची आहे. 25 वर्षांची ईशा क्रिकेटची मोठी फॅन आहे. क्रिकेट सामन्यांना ईशा रिषभ पंतची बहिण साक्षीसह अनेकदा स्टेडियमध्ये दिसली आहे. ईशा पेशानं इंटिरियर डेकोर डिझायनर आहे. नोएडातल्या अमिटी युनिव्हर्सिटीमधून तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. हेही वाचा - Ind vs SA T20: नियम बदलले पण अम्पायर विसरले… पाहा गुवाहाटीत अम्पायर्सनी केली ही चूक बीसीसीआयकडून शुभेच्छा बीसीसीआयनं ट्विट करत त्याच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
1⃣1⃣9⃣ international games 👌
— BCCI (@BCCI) October 4, 2022
3⃣8⃣9⃣7⃣ international runs 💪
1⃣7⃣3⃣ international dismissals as a wicketkeeper 👍
Here's wishing @RishabhPant17 - a swashbuckling batter & a solid wicketkeeper - a very happy birthday. 🎂 👏#TeamIndia pic.twitter.com/3E8IlrAWsb
सोनी नेटवर्ककडून खास व्हिडीओ शेअर सोनी नेटवर्कनंही रिषभ पंतच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. रिषभनं ऑस्ट्रेलियातल्या गॅबा मैदानावर 89 धावांची निर्णायक खेळी करुन भारतीय संघाला 32 वर्षांनी ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिकाविजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच इनिंगचा व्हिडीओ शेअर करुन सोनी स्पोर्ट्स नेटवर्कनं रिषभला बर्थडे विश केलं आहे.
हेही वाचा - Ind vs SA T20: क्लीन स्वीपच्या इराद्यानं टीम इंडिया इंदूरच्या मैदानात, पाहा संभाव्य प्लेईंग XI रिषभची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अवघ्या 25व्या वर्षी रिषभ पंत भारतीय क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीनं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यानं आतापर्यंत 31 कसोटी, 26 वन डे आणि 57 टी20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. महेंद्रसिंग धोनीनंतर पंतनं टीम इंडियाचा यष्टिरक्षक म्हणून आपली जबाबदारी आतापर्यंत प्रभावीपणे पार पाडली आहे.