मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA T20: नियम बदलले पण अम्पायर विसरले... पाहा गुवाहाटीत अम्पायर्सनी केली ही चूक

Ind vs SA T20: नियम बदलले पण अम्पायर विसरले... पाहा गुवाहाटीत अम्पायर्सनी केली ही चूक

भारत वि. दक्षिण आफ्रिका

भारत वि. दक्षिण आफ्रिका

Ind vs SA T20: सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. पण याच मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात मात्र अम्पायर्सना बदललेल्या नियमाचा मात्र विसर पडला आणि त्यांनी एक चूक केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

गुवाहाटी, 2 ऑक्टोबर: आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आयसीसीनं क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून सुरुही झाली. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. पण याच मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात मात्र अम्पायर्सना बदललेल्या नियमाचा मात्र विसर पडला आणि त्यांनी एक चूक केली. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेसमोर 238 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्याच ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेची 2 बाद 5 अशी अवस्था झाली होती आणि याचवेळी अम्पायर्सकडून ती चूक घडली.

नवीन बॅट्समनऐवजी डी कॉक स्ट्राईकवर

त्याचं झालं असं की दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर दक्षिण आफ्रिकेचा रिली रुसो कॅच दिनेश कार्तिककडे कॅच देऊन तंबूत परतला. त्यावेळी बॅट्समन एकमेकांना क्रॉस झाले. पण 1 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या नव्या नियमानुसार नवा बॅट्समन एडन मारक्रम स्ट्राईक घेणं अपेक्षित होतं. पण तसं न होता अर्शदीप सिंगच्या त्या ओव्हरचा पुढचा बॉल क्विंटन डी कॉकनं खेळून काढला. अम्पायर्सच्याही हे लक्षात आलं नाही.

काय आहे नियम?

कॅच आऊट नंतर नवा बॅट्समन स्ट्राईकवर - क्रिकेटच्या जुन्या नियमानुसार एखादा बॅट्समन कॅच आऊट झाला आणि त्यादरम्यान धाव घेताना दोन्ही बॅट्समन एकमेकांना क्रॉस झाल्यास नॉन स्ट्राईकर पुढचा बॉल खेळायचा. पण आता नव्या नियमानुसार जरी दोघे बॅट्समन क्रॉस झाले असतील तरी आऊट झालेल्या बॅट्समनच्या जागी येणारा नवा बॅट्समनच स्ट्राईकवर खेळणार आहे.

हेही वाचा - Ind vs SA: धक्कादायक... गुवाहाटीच्या सामन्यात मध्येच थांबला खेळ, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

गुवाहाटीत भारताचा धावांचा डोंगर

दरम्यान भारतानं या सामन्यात दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करताना धावांचा डोंगर उभारला. कॅप्टन रोहित शर्मानं लोकेश राहुलसह भारतीय डावाला दमदार सुरुवात करुन दिली. रोहितनं 37 बॉलमध्ये 7 फोर आणि एका सिक्ससह 43 धावा फटकावल्या. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनं आपल्या टी20 कारकीर्दीतलं 20वं अर्धशतक साजरं केलं. राहुलनं अवघ्या 28 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सह 57 धावा फटकावल्या. या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी साकारली.

त्यानंतर सूर्यकुमार आणि विराट कोहलीनं टीम इंडियाला 200 चा पल्ला गाठून दिला. सूर्यकुमार यादवनं तर वेगवान अर्धशतक झळकावलं. त्यानं अवघ्या 18 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर 22 बॉलमध्ये 5 फोर आणि 5 सिक्ससह 61 धावा फटकावल्या. विराटनंही आपला फॉर्म कायम राखताना 28 बॉल्समध्ये नाबाद 49 धावा केल्या. तर अखेरच्या ओव्हर्समध्ये मैदानात आलेल्या दिनेश कार्तिकनंही फटकेबाजी करताना 7 बॉलमध्ये नाबाद 17 धावा ठोकल्या.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Rohit sharma, Sports, T20 cricket