वडोदरा, 25 मार्च : कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सध्या 500हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे सोयी सुविधाही लोकांना मिळेनाशा झाल्या आहे. यासाठी आता भारतीय क्रिकेटपूट इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांनी तब्बल 4 हजार मास्क दान केले आहे. कोरोनामुळं लोकांना घरी राहण्याचे आवाहन सध्या करण्यात आले असले तरी,बाहेर जाताना मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यामुळं बाजारात जास्त किमतीने मास्क विकले जात होते. म्हणून पठाण बंधूंनी मास्क देण्याचा निर्णय घेतला. इरफान पठाणने व्हिडीओ पोस्ट करत, “समाजासाठी काही तर योगदान दिले पाहिजे. लोक या वेळी जे काही करू शकतात त्यांनी कृपया पुढे या आणि एकमेकांना मदत करा. आमच्याकडून ही छोटीशी मदत”, असे कॅप्शन दिले आहे. हे सर्व मास्क वडोदरा आरोग्य विभागाला देण्यात येतील जेणेकरून ते गरजूंना मदत करू शकतील. वाचा- VIDEO: 5 वर्षांच्या लेकीला कोरोनापासून वाचवण्यासाठी क्रिकेटपटूची धडपड
वाचा- ‘जिवंत राहिलो तर ऑलिम्पिक खेळेन’, भारतीय खेळाडूनं व्यक्त केल्या भावना विशेष म्हणजे या कठीण काळात इरफानने चाहत्यांना आपल्या ट्विट आणि व्हिडिओद्वारे कोरोनाव्हायरसशी लढण्याचा सल्ला देत राहतो. असाच त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये इरफान आपला भाऊ युसूफ पठाणसोबत दिसत आहे. या व्हिडीओमध्ये या दोघांनी एका सिनेमाचा सीन केला आहे. यात इरफान युसूफला हस्तांदोलन करण्याचा प्रयत्न करतो. मात्र युसूफ त्याला हम हाथ नही मिलाते, असे म्हणतो. हा व्हिडीओ शेअर करताना इरफानने लाला हाथ तो मिला लेते, असे कॅप्शन दिले आहे. वाचा- जनता कर्फ्यूमध्ये क्रिकेट खेळणं पडलं महागात, पोलिसांनी अशी काढली ‘विकेट’
वाचा- सेहवागच्या कोरोनामुक्त आसनने सारे हैराण, VIDEO पाहून बघा तुम्हाला जमतंय का इरफानने याचवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तर, अलीकडेच तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये खेळताना दिसला होता. तर, युसूफ पठाण रणजीमध्ये वडोदरा संघाकडून खेळतो, मात्र भारतीय संघात त्याला जागा मिळवता आलेली नाही आहे.