नवी दिल्ली, 23 मार्च : कोरोना व्हायरसनं जगभर हाहाकार उडाला आहे. असं कोणतंच क्षेत्र उरलं नाही जिथं कोरोनाची भीती नाही. क्रीडा क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. आता यावर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिक पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारताचा कुस्तीपट्टू बजरंग पुनियासुद्धा ऑलिम्पिकची तयारी करत आहे. पण स्पर्धा वेळेवर होईल का अशी शंका त्याला आहे. पुनिया म्हणतो की, सध्याची परिस्थिती पाहता स्पर्धा पुढे ढकलणं योग्य ठरेल.
बजरंग पुनियाने इंडियन एक्सप्रेसला दिल्या मुलाखतीत म्हटलं की, सध्याचं वातावरण इतकं धोकादायक आहे की ऑलिम्पिक स्थगित करणं चांगलं ठरेल. हे फक्त आपल्यासाठी नाही तर सर्व देशांमधील अॅथलीटसाठी फायद्याचं ठरेल. प्रत्येकासाठी ही कठीण वेळ आहे.
आयओसीने शेड्युलनुसार स्पर्धा खेळवण्याचा विचार केला आणि इतर देशही सहभागी झाले तर आम्हालाही जावं लागेलं असं पुनियानं सांगितलं. मात्र ऑलिम्पिकसाठी किमान दोन-चार महिने वाट बघावी. परिस्थिती सुधारायला हवी. जिवंत राहिलो तर ऑलिम्पिक खेळू शकेन. पण आम्हीच नाही राहिलो तर ऑलिम्पिकचे काय? असा सवाल बजरंग पुनियाने विचारला आहे.
हे वाचा : जनता कर्फ्यूमध्ये क्रिकेट खेळणं पडलं महागात, पोलिसांनी अशी काढली 'विकेट'
बजरंग म्हणाला की, खरं सांगायचं तर मी सध्या ऑलिम्पिकबद्दल विचार करत नाही. सध्यातरी आम्हाला व्हायरसपासून सुरक्षित रहायला हवं. याचा अर्थ असा नाही की प्रशिक्षण, सराव बंद केला आहे. मात्र त्याचसोबत आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्वाचं आहे.
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारव विजेता बजरंग सध्या सोनीपत इथं घरात बंद करून घेतल्यासारखं राहत आहे. तिथंच त्याचा सराव करत आहे. बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिकचं असं काउंटडाउन करावं लागेल अशी कधीही कल्पना केली नव्हती.
हे वाचा : सचिनच्या मित्रानं लैंगिक शोषण केल्याचा आरोप, क्रिकेटपटूवर निलंबनाची कारवाई मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.