वाचा-जनता कर्फ्यूमध्ये क्रिकेट खेळणं पडलं महागात, पोलिसांनी अशी काढली 'विकेट' सावध राहण्याची वेळ डेव्हिड वॉर्नरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये आपण सावधगिरी बाळगली पाहिजे , तो आपली मुलगी इंडीशी बोलताना दिसत आहे. वॉर्नरची लेक या व्हिडीओमध्ये सॅनिटायझर वापरताना दिसत आहे. त्यावर वॉर्नरने इंडिला, तु असं का करत आहेस? असे विचारले. त्यावर इंडिने व्हायरसला मारण्यासाठी, असे निरागसणे उत्तर दिले. हा व्हिडीओ अपलोड करताना वॉर्नरने, आम्ही मुलींना हात धुण्यासाठी जागरूक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. हा आपल्या रोजच्या रोजचा भाग असावा, असे कॅप्शन दिले आहे. वाचा-'या' आईच्या तरी भावनांचा आदर करा, PM मोदींनी शेअर केला भावुक करणारा VIDEO 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजला आहे. कोरोना विषाने आतापर्यंत जगभरातील 16 हजारहून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. तर, 3.6 लाखाहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. एकट्या इटलीमध्ये कोरोनामुळे 6, हजार 077 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूची संख्या प्रत्येक देशात झपाट्याने वाढत आहे. जगातील 190 देशांना कोरोनाने वेढले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.