सेहवागच्या कोरोना'मुक्त' आसनने सारे हैराण, VIDEO पाहून बघा तुम्हाला जमतंय का

सेहवागच्या कोरोना'मुक्त' आसनने सारे हैराण, VIDEO पाहून बघा तुम्हाला जमतंय का

सेहवागने सांगितला कोरोनाला पळवण्याचा मंत्र, हा VIDEO बघाच.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 मार्च : कोरोनाव्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. 160 पेक्षा जास्त देशांना याचा फटका बसला आहे. भारतातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सरकार सध्या सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. प्रत्येक राज्यातील शाळा, महाविद्यालये, ऑफिसे बंद करण्यात आली आहेत. तर लोकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतात कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सध्या लोकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात कोरोनामुक्त आसान काय असते हे दाखवले आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

वाचा-VIDEO : स्कूटीवर एक दोन नाही तर 5 मुलींना बसवून बाहेर पडला, पाहा पुढे काय झालं

या व्हिडिओमध्ये एक महिला मेट्रो सीटवर एकटी बसलेली दिसत आहे. तिच्या शेजाही बसण्यासाठी एक माणूस येते, त्यावर ताबडतोब मुलगी संपूर्ण सीटवर आपले पाय पसरते. व्हिडीओ पोस्ट करताना सेहवागने कॅप्शनमध्ये , “कोरोना प्रतिरोधक आसन, कृपया लोकांपासून दूर रहा आणि त्यांना दूर ठेवा. कृपया अंतर ठेवा आणि घरी रहा“, असे लिहिले आहे.

वाचा-13 मुलं, 6 लग्न! हा 'टिकटॉक स्टार' व्हिडीओ पाहून करतो तरुणींशी लग्न

वाचा-टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटपटूसाठी कोरोना म्हणजे 'वरदान', वाचवणार करिअर

भारतात वाढत्या कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांना पर्याप्त प्रमाणात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचे उच्च-प्रवाह मुखवटे खरेदी करण्यास सांगितले आहे. तसेच, गर्दी कमी करण्यासही सांगितले आहे.

First published: March 23, 2020, 7:55 AM IST
Tags: corona

ताज्या बातम्या