मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2023 Auction: दोन कोटी बेस प्राइसच्या खेळाडूत एकही भारतीय नाही, 277मध्ये सर्वाधिक 'या' देशाचे

IPL 2023 Auction: दोन कोटी बेस प्राइसच्या खेळाडूत एकही भारतीय नाही, 277मध्ये सर्वाधिक 'या' देशाचे

इंडियन प्रीमयर लीग 2023 च्या आधी खेळाडुंचा मिनी लिलाव होणार आहे. यासाठी 991 खेळाडुंनी नावे दिली असून यात 714 भारतीय तर 277 खेळाडु इतर देशांमधील आहेत.

इंडियन प्रीमयर लीग 2023 च्या आधी खेळाडुंचा मिनी लिलाव होणार आहे. यासाठी 991 खेळाडुंनी नावे दिली असून यात 714 भारतीय तर 277 खेळाडु इतर देशांमधील आहेत.

इंडियन प्रीमयर लीग 2023 च्या आधी खेळाडुंचा मिनी लिलाव होणार आहे. यासाठी 991 खेळाडुंनी नावे दिली असून यात 714 भारतीय तर 277 खेळाडु इतर देशांमधील आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 02 डिसेंबर : इंडियन प्रीमयर लीग 2023 च्या आधी खेळाडुंचा मिनी लिलाव होणार आहे. यासाठी 991 खेळाडुंनी नावे दिली असून यात 714 भारतीय तर 277 खेळाडु इतर देशांमधील आहेत. यामध्ये 2 कोटी बेस प्राइस असलेल्या यादीत 21 खेळाडुंनी नावे दिली आहेत. पण यात एकही भारतीय खेळाडु नाही. 23 डिसेंबर 2022 रोजी कोच्चीमध्ये लिलाव होणार आहे.

परदेशी खेळाडुंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 57 क्रिकेटपटू आहे. यानंतर दक्षिण आफ्रिकेचे 52 खेळाडु आहे. तर वेस्टइंडिजचे 33, इंग्लंडचे 31, न्यूझीलंडचे 27, श्रीलंकेचे 23, अफगाणिस्तानचे 14, आय़र्लंडचे 8, नेदरलँडचे 7, बांगलादेशचे 6, युएईचे 6, झिम्बॉब्वेचे 6, नामीबियाचे 5, स्कॉटलँडचे 2 खेळाडु आहेत.

हेही वाचा : ऋतुराज गायकवाडचा शतकांचा चौकार, विजय हजारे ट्रॉफीत केला सर्वाधिक शतकांचा विक्रम

बीसीसीआय़ने जारी केलेल्या पत्रकानुसार सचिव जय शहा यांनी सांगितले की, जर प्रत्येक फ्रँचाइजीने त्यांच्या संघात कमाल 25 खेळाडुंना घेतले तर या लिलावात 87 खेळाडुंसाठी बोली लागेल. यात 30 परदेशी खेळाडू होऊ शकते. खेळाडुंच्या यादीत 185 क्रिकेटपटू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले आहेत. याशिवाय 786 खेळाडु हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळले तर 20 खेळाडु हे आयसीसीच्या असोसिएट नेशन्सचे आहेत. भारताचे 91 खेळाडु असे आहेत जे आधी आयपीएलमध्ये खेळले आहेत.

2 कोटी बेस प्राइस असलेल्या खेळाडुंमध्ये इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरन ग्रीन, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन, निकोलस पूरन, नाथन कूल्टन नाइल, ट्रव्हिस हेड, क्रिस लिन, टॉम बॅटन, क्रिस जॉर्डन, टाइमल मिल्स, जेमी ओवरटन, क्रेग ओवरटन, आदिल राशिद, फिल सॉल्ट, एडम मिल्ने, जिमी निशाम, केन विल्यम्सन, रिले रोसोव्ह, रासी वॅन डेर डूसन, अँजेलो मॅथ्यूज, निकोलस पूरन आणि जेसन होल्डर यांचा समावेश आहे.

हेही वाचा : काय सांगता? एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्स! अशी कामगिरी करणारा पुण्याचा ऋतुराज जगातील पहिला खेळाडू

भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या 19 खेळाडुंनी मिनी लिलावासाठी नावे दिली आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, मयंक अग्रवाल या खेळाडुंचा समावेश आहेत. अजिंक्य रहाणेची बेस प्राइस 50 लाख आहेत. तर मयंक अग्रवाल 1 कोटी आणि जयदेव उनादकटची बेस प्राइस 50 लाख आहे.

First published:

Tags: Ajinkya rahane, Australia, Cricket, Ipl, IPL auction, Team india