जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022: या 3 कारणांमुळे KKR ठरू शकतो चॅम्पियन, अय्यर ठरणार X फॅक्टर

IPL 2022: या 3 कारणांमुळे KKR ठरू शकतो चॅम्पियन, अय्यर ठरणार X फॅक्टर

IPL 2022: या 3 कारणांमुळे KKR ठरू शकतो चॅम्पियन, अय्यर ठरणार X फॅक्टर

यावर्षीची पहिली मॅच 26 मार्च 2022 रोजी गतविजेते CSK आणि गेल्या वर्षीचे फायनालिस्ट KKR या टीम्सदरम्यान होणार आहे. गेल्या वर्षी विजेतेपदानं हुलकावणी दिल्यामुळे KKR जास्त आक्रमक प्रयत्न करणार. टीममध्ये अनेक दिग्गज आणि ऑलराउंडर खेळाडूंचा समावेश असल्यानं टीमचं मनोधैर्यही वाढलं आहे हे नक्की.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 26 मार्च : आजपासून IPL च्या या वर्षीच्या हंगामाला सुरुवात होत आहे. सगळ्या क्रिकेट फॅन्सचं याकडे लक्ष लागलं आहे. त्यातही आपल्या आवडत्या प्लेयर्सच्या कामगिरीकडे सगळेच लक्ष लावून बसले आहेत. यंदाच्या स्ट्राँग टीम्समध्ये कोलकाता नाइट रायडर्सचं (KKR) नाव प्रामुख्यानं घेतलं जात आहे. यावर्षीची पहिली मॅच 26 मार्च 2022 रोजी गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गेल्या वर्षीचे फायनालिस्ट कोलकाता नाइट रायडर्स (KKR) या टीम्सदरम्यान होणार आहे. अर्थातच विजयानं सुरुवात करण्याचा दोन्ही टीम्सचा प्रयत्न असेल. गेल्या वर्षी विजेतेपदानं हुलकावणी दिल्यामुळे KKR जास्त आक्रमक प्रयत्न करणार. टीममध्ये अनेक दिग्गज आणि ऑलराउंडर खेळाडूंचा समावेश असल्यानं टीमचं मनोधैर्यही वाढलं आहे हे नक्की. कोणत्याही क्षणी मॅच आपल्या बाजूनं फिरवण्याची क्षमता असलेले खेळाडू यंदा KKR मध्ये आहेत. कोलकाता नाइट रायडर्स टीमला IPL च्या या हंगामाच्या विजयाचे संभाव्य दावेदार मानलं जात आहे. क्रिकेट अ‍ॅडिक्टर या वेबसाइटवर याबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे. 1. युवा खेळाडू श्रेयस अय्यरकडे (Shreyas Ayyar) सगळ्यांचं लक्ष असेल. श्रेयस अय्यरनं यापूर्वीच्या IPL मध्ये आपली दमदार कामगिरी दाखविली आहे. IPL मधल्या कामगिरीमुळेच श्रेयसला टीम इंडियात स्थान मिळालं होतं. एक खेळाडू म्हणून तर त्याची कामगिरी चांगली आहेच; पण त्याचबरोबर तो कॅप्टन्सीही उत्तमरीत्या सांभाळू शकतो. KKR पूर्वी श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन होता. 2018 मध्ये त्याच्याकडे कॅप्टनपदाची धुरा देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचं नशीबच पालटलं असं मानलं जातं.

    हे वाचा - CSK vs KKR सामन्याने IPL ला सुरूवात, पहिल्याच सामन्यात हे 5 खेळाडू करणार धमाका!

    अय्यर कॅप्टन झाल्यानंतर सहा वर्षांनी 2019 मध्ये दिल्लीनं प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं होतं. इतकंच नाही, तर 2020 मध्ये श्रेयसच्या नेतृत्वाखालीच दिल्लीनं पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला होता. अर्थातच त्यामुळे श्रेयस अय्यर हा एक उत्तम कॅप्टन असल्याचं बोललं जाऊ लागलं. आता यंदा KKR साठीही श्रेयसकडून भरपूर अपेक्षा आहेत. श्रेयसमुळे KKR यंदा IPL विजेतेपद मिळवू शकतं अशी चर्चा आहे. यंदाच्या IPL लिलावामध्ये श्रेयस अय्यरसाठी KKR नं 12.25 कोटींची बोली लावून त्याला आपल्या टीममध्ये खेचून घेतलं. 2. श्रेयसशिवाय KKR मध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. सगळ्यांचं विशेष लक्ष आहे ते आंद्रे रसेलकडे (Andre Russel). आंद्रे रसेल गेली किती तरी वर्षं IPL मध्ये KKR शी जोडला गेला आहे. आपली बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर त्यानं टीमला अनेक मॅचेस जिंकून दिल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामातही रसेल मॅचविनर ठरतो का याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे. त्याशिवाय टीममध्ये व्यंकटेश अय्यर, मोहम्मद नबी यांच्यासारखे ऑलराउंडर्सही आहेत. कोणत्याही टीममध्ये 2 ते 3 ऑलराउंडर्स असणं महत्त्वाचं आहे. यंदाच्या हंगामामध्ये KKR मध्ये क्वालिटी ऑलराउंडर्सची संख्या जास्त आहे. त्यामुळे ही टीम यंदा IPL जिंकण्याची शक्यता मोठी आहे.

    हे वाचा -  IPL 2022 : KKR करणार धोनीवर दुतर्फा हल्ला, माहीला रोखण्यासाठी श्रेयसचा खास प्लॅन

    3. KKR ची टॉप ऑर्डरही जबरदस्त आहे. IPL मध्ये टॉप ऑर्डर चांगली असणं ही त्या टीमसाठी जमेची बाजू असते. त्याशिवाय टीममध्ये अनुभवी भारतीय बॅट्समनही आहेत. त्यांना भारतीय परिस्थितीचा चांगलाच अंदाज आहे, हीदेखील टीमसाठी जमेची बाजू आहे. केकेआरमध्ये एरॉन फिंच, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा यांच्यासारखे जबरदस्त बॅट्समन आहेत. त्याचबरोबर आयपीएलमधला अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) आहे. या सगळ्या परिस्थितीत KKR च्या फॅन्सच्या आशा जास्तच पल्लवित झाल्या आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात