मुंबई, 26 मार्च : चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) मागील सिझनमधील फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी केकेआरला (KKR) आहे. या दोन्ही टीममध्ये आज (शनिवार) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनमधील (IPL 2022) पहिला सामना होत आहे. केकेआरची टीम यंदा श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) कॅप्टनसीमध्ये खेळणार आहे. या मॅचमध्ये सीएसकेला रोखण्यासाठी कोलकातानं खास योजना आखली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) केकेआरचं मुख्य टार्गेट असेल. धोनीला रोखण्यासाठी श्रेयस दोन्ही बाजूनं त्याच्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूनं हल्ला म्हणजेच धोनीला खेळण्यासाठी अवघड असलेल्या दोन बॉलर्सचा त्याच्या विरूद्ध श्रेयस वापर करणार आहे. केकेआरमधील दोन बॉलर्सच्या विरूद्ध धोनीचा रेकॉर्ड खराब आहे. त्यामुळे धोनी मैदानात बॅटींगसाठी येतात श्रेयस त्यांचा वापर करू शकतो. यामधील पहिलं नाव आहे, वरूण चक्रवर्ती. धोनी आणि वरूणचा (Varun Chakravarthy) तीन वेळा आजवर आयपीएलमध्ये सामना झाला आहे. या तीन्ही मॅचमध्ये वरूणनं धोनीला आऊट केलं आहे. या दरम्यान धोनीनं वरून विरूद्ध 12 बॉलमध्ये 3.33 च्या सरासरीनं 10 रन दिले आहेत. धोनीनं 12 बॉलमध्ये 3 वेळा वरूण विरूद्ध विकेट गमावली आहे. IPL 2022, CSK vs KKR Dream 11 Prediction: ‘या’ 11 जणांवर आजमवा तुमचं भविष्य धोनीनं वरूणचा सामना केला तरी त्याची परीक्षा घेण्यासाठी केकेआरचा अनुभवी स्पिनर सुनील नरीन (Sunil Narine) सज्ज असेल. आयपीएलमध्ये धोनीनं नरीन विरूद्ध आजवर 83 बॉलचा सामना केला आहे. त्यानं यामध्ये 22 च्या सरासरीनं 44 रन केले आहेत. नरीननं 2 वेळा धोनीची विकेट घेतली आहे. धोनीची आक्रमक बॅटर म्हणून ओळख आहे. पण, आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासात धोनीनं फक्त 2 वेळा नरीनचा बॉल बाऊंड्रीच्या पार धाडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.