मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 : सलग दुसऱ्या पराभवानंतर मुंबईला पडलेल्या प्रश्नाचं रोहितनं दिलं उत्तर

IPL 2022 : सलग दुसऱ्या पराभवानंतर मुंबईला पडलेल्या प्रश्नाचं रोहितनं दिलं उत्तर

मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्स विरूद्ध (Mumbai Indians vs Rajasthan Royals) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कमतरता जाणवली

मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्स विरूद्ध (Mumbai Indians vs Rajasthan Royals) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कमतरता जाणवली

मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्स विरूद्ध (Mumbai Indians vs Rajasthan Royals) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कमतरता जाणवली

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 मार्च : मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्स विरूद्ध (Mumbai Indians vs Rajasthan Royals) शनिवारी झालेल्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) कमतरता जाणवली. राजस्थाननं दिलेलं 194 चं लक्ष मुंबईला पूर्ण करता आलं नाही. त्यांचा 23 रननं पराभव झाला. राजस्थाननं पहिल्यांदा बॅटींग करत 8 आऊट 193 रन केले. त्याला उत्तर देताना मुंबईची टीम 8 आऊट 170 रन करू शकली.

रोहितनं या मॅचनंतर बोलताना टीमची कामगिरी तसंच सूर्यकुमारच्या फिटनेसबाबत स्पष्टीकरण दिले. 'या पिचवर 193 रनचं टार्गेट पूर्ण व्हायला हवं होतं. विशेषत: आम्हाला शेवटच्या 7 ओव्हर्समध्ये 70 रनची आवश्यकता  होती. या प्रकारच्या गोष्टी घडत असतात. हा स्पर्धेचा सुरूवातीचा काळ आहे. आम्ही यामधून योग्य तो धडा घेऊ.

जसप्रीत बुमराह आणि मिल्सनं चांगली बॉलिंग केली. तिलकनं जबरदस्त बॅटींग केली. इशानची बॅटींगही चांगली झाली.  माझ्यामते या दोघांपैकी एक जण शेवटपर्यंत राहिला असता तर निकालात फरक पडला असता,' असे रोहितने सांगितले. त्यानंतर त्याने सूर्यकुमार यादवच्या फिटनेसवर माहिती दिली. 'तो आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. फिट झाल्यानंतर थेट टीममध्ये खेळेल, पण त्यानं बोटाला झालेल्या दुखापतीमधून पूर्णपणे फिट व्हावं अशी आमची अपेक्षा आहे.' असं रोहितनं सांगितलं. रोहितच्या या वक्त्यव्यामुळे सूर्यकुमार फिटनेसच्या कारणामुळेच राजस्थान विरूद्ध खेळला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबईकडून तिलक वर्माने 33 बॉलमध्ये 61 तर इशान किशनने 43 बॉलमध्ये 54 रन केले. राजस्थानकडून युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर ट्रेन्ट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि आर.अश्विन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

Women's World Cup Final : पंतप्रधान मोदींनी फायनलपूर्वी दिल्या ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा

मुंबईविरुद्धच्या या विजयासोबतच राजस्थानने या मोसमातल्या दोन पैकी दोन मॅच जिंकल्या आहेत. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्येही ते पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे मुंबईचा दिल्ली आणि राजस्थानविरुद्ध पराभव झाल्यामुळे ते नवव्या क्रमांकावर आहेत.

First published:

Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma, Suryakumar yadav