Home /News /sport /

Women's World Cup Final : पंतप्रधान मोदींनी फायनलपूर्वी दिल्या ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा

Women's World Cup Final : पंतप्रधान मोदींनी फायनलपूर्वी दिल्या ऑस्ट्रेलियाला शुभेच्छा

न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल (Women's World Cup 2022 Final) सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या फायनलसाठी ऑस्ट्रेलियन टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

    मुंबई, 3 मार्च :  न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेची फायनल (Women's World Cup 2022 Final) सध्या सुरू आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia W vs England W) यांच्यात ही फायनल सुरू असून यामध्ये ऑस्ट्रेलियन टीम पहिल्यांदा बॅटींगला उतरली आहे. या वर्ल्ड कप फायनलपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ऑस्ट्रेलियन टीमला शुभेच्छा दिल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आर्थिक नाते भक्कम करण्यासाठी एक ऐतिहासिक करार शनिवारी झाला, त्यावेळी मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, 'मी ऑस्ट्रेलियन महिला टीमचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आयसीसी महिला वर्ल्ड कप फायनलसाठी त्यांना शुभेच्छा देतो.' यापूर्वी मोदी यांनी महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियन टीमनं केलेल्या चांगल्या कामगिरीसाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन यांचे अभिनंदन केले. भारतीय टीमला यंदा सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला शेवटची लीग मॅच जिंकणे आवश्यक होते, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. 7 वा वर्ल्ड कप जिंकण्याची संधी महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा जबरदस्त रेकॉर्ड आहे. या दोन्ही देशांनी मिळून 10 वर्ल्ड कप जिंकले आहेत. यंदा तब्बल 34 वर्षांनी दोन्ही देश फायनलमध्ये एकमेकांच्या समोर आले आहेत. यापूर्वी 1988 साली ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड अशी फायनल झाली होती. ऑस्ट्रेलियन टीमनं त्यामध्ये विजय मिळवला होता. यंदा सातव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. तर इंग्लंडची टीम हा वर्ल्ड कप आपल्याकडेच राखण्याच्या उद्देशानं खेळत आहे. IPL 2022 : फर्ग्युसनच्या भेदक बॉलिंगपुढे दिल्ली गडगडली, गुजरातचा लागोपाठ दुसरा विजय ऑस्ट्रेलियाचा यापूर्वी 2000 साली महिला वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव झाला होता. त्यावेळी न्यूझीलंडनं त्यांचा थरारक मॅचमध्ये 4 रननं पराभव केला. यंदा ऑस्ट्रेलियानं सर्व सामने जिंकत फायनल गाठली आहे. तर इंग्लंडनं पहिल्या 3 सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर पुढील सर्व सामने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Australia, Cricket news, Pm narenda modi

    पुढील बातम्या