मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2022 Retention: टीम इंडियाच्या 8 खेळाडूंना IPL संघानी दिला डच्चू

IPL 2022 Retention: टीम इंडियाच्या 8 खेळाडूंना IPL संघानी दिला डच्चू

IPL 2022 Retention

IPL 2022 Retention

आयपीएल 2022 (IPL 2022 Retention) साठी आजचा दिवस मोठा आहे.

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022 Retention) साठी आजचा दिवस मोठा आहे. टी-20 लीगचे 8 जुने संघ कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करतील. हे संघ त्यांच्यासोबत 4 खेळाडूंना रिटेन करु शकणार आहेत. दरम्यान, नविन अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाच्या 8 खेळाडूंना 8 जुन्या संघांनी डच्चू दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

टी-20 लीगच्या चालू मोसमापासून 10 संघ स्पर्धेत उतरणार आहेत. संघांची पर्स 85 कोटींवरून 90 कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच यावेळी खेळाडूंच्या लिलावावर जास्त पैसे खर्च होणार आहेत. बीसीसीआयने नुकतेच लखनऊ आणि अहमदाबाद येथील T20 लीगमध्ये 2 नवीन संघ जोडले आहेत. दोघांच्या लिलावातून मंडळाला सुमारे १३ हजार कोटी रुपये मिळाले आहेत.

आयपीएलच्या 8 संघांबद्दल बोलायचे तर त्यांनी 2021 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत प्रवेश केलेल्या 8 भारतीय खेळाडूंना कायम ठेवण्यास नकार दिला आहे. सर्वप्रथम केएल राहुल. अलीकडेच त्याला टीम इंडियाच्या टी 20 संघाचा नवा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता. मात्र तो स्वतः संघापासून दुरावत चालला आहे. तो लखनऊ संघाला जोडला जाण्याची शक्यता आहे. त्याने फलंदाज म्हणून चमकदार कामगिरी केली, पण संघाची कामगिरी चांगली केली नाही.

हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमारही

हार्दिक पांड्या फिटनेसच्या समस्येशी झुंजत आहे. टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याची कामगिरी निराशजनक ठरली. न्यूझीलंड मालिकेसाठीही त्याची निवड झाली नव्हती. दक्षिण आफ्रिका मालिकेतून त्याने माघार घेतल्याचे वृत्त आहे. तो सध्या गोलंदाजीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

सूर्यकुमार यादवची टी-20 मध्ये कामगिरी चांगली झाली आहे. पण या दोन्ही खेळाडूंना मुंबई इंडियन्सकडून कायम ठेवण्याची शक्यता कमी आहे. लेगस्पिनर राहुल चहरलाही कायम ठेवले जाणार नाही. मुंबईने सर्वाधिक 5 वेळा टी-20 लीगचे विजेतेपद पटकावले आहे.

धोनीचा चॅम्पियन खेळाडूचादेखील पत्ता कट

वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने आयपीएल 2021 मध्ये सीएसकेसाठी चमकदार कामगिरी केली. सीएसकेनेही विजेतेपद पटकावले. पण त्याला संघात कायम ठेवण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय आर अश्विनला 4 वर्षांनंतर टी-20 वर्ल्ड कपमध्ये टी-20 इंटरनॅशनल खेळण्याची संधी मिळाली. दिल्ली कॅपिटल्सकडून त्याला कायम ठेवण्याची आशा कमी आहे.

मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांची कामगिरीही टी-20 मध्ये निराशजनक ठरली. शमी पंजाब किंग्जकडून तर भुवनेश्वर आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला.

अशा परिस्थितीत हे सर्व 8 खेळाडू आता मेगा लिलावात सहभागी होणार आहेत. दोन नवीन संघ आल्याने हे खेळाडू लीगमध्ये खेळणार हे निश्चित असले तरी लिलावात त्यांना किती कमाई मिळते याकडे सर्वांच्या नजरा असतील. दोन नवीन संघ त्यांच्यासोबत 3-3 खेळाडू जोडू शकतील. मात्र त्यांना नंतर संधी मिळेल.

First published:

Tags: Hardik pandya, Ipl 2021 auction, Ipl 2022, Kl rahul, Shardul Thakur, Suryakumar yadav