जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : अजिंक्यनं कॅच सोडताच श्रेयस अय्यरचा राग अनावर, पाहा VIDEO

IPL 2022 : अजिंक्यनं कॅच सोडताच श्रेयस अय्यरचा राग अनावर, पाहा VIDEO

IPL 2022 : अजिंक्यनं कॅच सोडताच श्रेयस अय्यरचा राग अनावर, पाहा VIDEO

टीम इंडियाचा माजी व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) चांगला फिल्डर म्हणून ओळख आहे. पण, अजिंक्यनं मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये (MI vs KKR) एक सोपा कॅच सोडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 एप्रिल : टीम इंडियाचा माजी व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) चांगला फिल्डर म्हणून ओळख आहे. पण, अजिंक्यनं मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या मॅचमध्ये (MI vs KKR) एक सोपा कॅच सोडला. हा कॅच केकेआरचा विकेट किपर सॅम बिलिंग्सच्या जवळ होता. पण, अजिंक्यनं लांबहून पळत येत तो कॅच घेणार असल्याचं सांगितलं होतं. अखेर अजिंक्यनंही हा कॅच घेतला नाही आणि त्यानं बिलिंगलाही कॅच घेऊ दिला नाही. मुंबई इंडियन्सच्या इनिंगमधील 13 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. कोलकाताकडून उमेश यादव (Umesh Yadav) बॉलिंग करत होता. त्याच्या ओव्हरमध्ये तिलक वर्माचा (Tilak Varma) उंच उडालेला कॅच पकडण्यासाठी अजिंक्य धावला. तो बॉलच्या खाली व्यवस्थित पोहचला होता. पण, त्याला कॅच पकडता आला नाही. अजिंक्यनं कॅच सोडताच कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) चांगलाच नाराज झाला. अय्यरच्या नाराजीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर उमेश यादवलाही अजिंक्यनं चूक केल्यावर विश्वास बसला नाही.

जाहिरात

अजिंक्यची चूक महाग अजिंक्य रहाणेनं केलेली ही चूक चांगलीच महागात पडली. त्यानं कॅच सोडली त्यावेळी तिलक फक्त 3 रनवर खेळत होता. तिलकनं 27 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं नाबाद 38 रन केले. त्यानं चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवबरोबर 87 रनची आक्रमक भागिदारी केली. या भागिदारीमुळेच मुंबईला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 161 पर्यंत मजल मारता आली. मुंबईककडून कायरन पोलार्डनं शेवटच्या ओव्हरमध्ये दमदार फटकेबाजी करत 5 बॉलमध्ये नाबाद 22 रन केले. IPL 2022 : मुंबईच्या खराब कामगिरीनंतर रोहितवर आणखी एक नामुश्की, लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद कमिन्सनं वाचवलं 162 रनचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंगला आलेल्या अजिंक्य रहाणेला बॅटींगमध्येही कमाल करता आली नाही. तो फक्त 7 रन काढून आऊट झाला. केकेआरची अवस्था 5 आऊट 101 अशी झाली होती. त्यावेळी पुण्यातील मैदानात आलेल्या पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळानं केकेआरला वाचवलं. कमिन्सनं  15 बॉलमध्ये नाबाद 56 रनची वादळी खेळी केली.त्याने फक्त 14 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण करत आयपीएल रेकॉर्ड देखील केला आहे. मुंबई इंडियन्सचा फस्ट बॉलर डॅनियल सॅम्सच्या (Daniel Sams) एकाच ओव्हरमध्ये कमिन्सनं 35 रन काढले. कमिन्सच्या या फटकेबाजीमुळे केकेआरनं चार ओव्हर्स आणि 5 विकेट्स राखत मुंबई इंडियन्सचा पराभव केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात