जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022 : मुंबईच्या खराब कामगिरीनंतर रोहितवर आणखी एक नामुश्की, लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद

IPL 2022 : मुंबईच्या खराब कामगिरीनंतर रोहितवर आणखी एक नामुश्की, लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद

IPL 2022 : मुंबईच्या खराब कामगिरीनंतर रोहितवर आणखी एक नामुश्की, लाजीरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या फॉर्मात नाही. बुधवारी केकेआर विरूद्धच्या मॅचमध्ये रोहित 12 बॉलमध्ये फक्त 3 रन काढून आऊट झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 एप्रिल : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरूवात खराब झाली आहे. मुंबईनं पहिल्या तीन मॅच गमावल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील सध्या फॉर्मात नाही. बुधवारी केकेआर विरूद्धच्या मॅचमध्ये रोहित 12 बॉलमध्ये फक्त 3 रन काढून आऊट झाला. या सिझनमध्ये जबरदस्त खेळ करत असलेल्या उमेश यादवनं (Umesh Yadav) रोहितला आऊट केलं. यावेळी रोहितच्या नावावर एक नकोसा रेकॉर्डही नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेत 61 वेळा एक अंकी रन काढून आऊट झाला आहे. त्यानं याबाबतीत आरसीबीचा विकेट किपर-बॅटर दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) मागे टाकलंय. कार्तिक आत्तापर्यंत 60 वेळा एक अंकी रन काढून आऊट झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. रैनाला 53 वेळा दोन अंकी रन करण्यात अपयश आलं आहे. मुंबईचं 162 रनचं आव्हान 16 ओव्हरमध्येच पार केलं. पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) 15 बॉलमध्ये नाबाद 56 रनच्या वादळी खेळीमुळे केकेआरनं ही मॅच 24 बॉल राखून जिंकली. केकेआरला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये विजयासाठी 35 रनची गरज होती, पण डॅनियल सॅम्सने एकाच ओव्हरमध्ये 35 रन दिले. सॅम्सच्या 16 व्या ओव्हरमध्ये कमिन्सने 4 सिक्स आणि 2 फोर मारल्या, याचसोबत त्याने एक नो बॉलही टाकला. कमिन्सने तब्बल 373.33 च्या स्ट्राईक रेटने रन काढले. IPL 2022, MI vs KKR : बुमराहसह एका भारतीय खेळाडूवर कारवाई, BCCI नं सुनावली ‘ही’ शिक्षा त्यापूर्वी केकेआरने मुंबईला पहिल्यांदा बॅटिंगला बोलावल्यानंतर मुंबईने (MI vs KKR) 20 ओव्हरमध्ये 4 आऊट 161 पर्यंत मजल मारली. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), तिलक वर्मा (Tilak Varma) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांनी केलेल्या धमाक्यामुळे मुंबईला या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. पोलार्डने तब्बल 440 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली, त्याने 5 बॉलमध्ये 3 सिक्स मारत नाबाद 22 रन केले. तिलक वर्मा 27 बॉलमध्ये 38 रनवर नाबाद राहिला. सूर्यकुमार यादवने 36 बॉलमध्ये 52 रनची खेळी केली, त्याने 5 फोर आणि 2 सिक्स लगावल्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात