मुंबई, 2 मे: लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) आयपीएलच्या (IPL) या मोसमात पदार्पण केले असून आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी सात सामने जिंकले आहेत. यासह संघाने आता आयपीएल 2022 च्या गुणतालिकेत (IPL Points Table) दुसरे स्थान काबीज केले आहे. आयपीएलच्या 45व्या लीग सामन्यात लखनऊने दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 6 धावांनी पराभव केला. या विजयानंतर संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. सध्या त्यांच्या बट्स सेलिब्रेशनचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. फास्ट बॉलर मोहसीन खानच्या (Mohsin Khan) आक्रमणापुढे दिल्लीची बॅटिंग गडगडल्यामुळे लखनऊ सुपर जाएंट्सचा (Delhi Capitals vs Lucknow Super Giants) 6 रनने विजय झाला. लखनऊने दिलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 189/7 पर्यंत मजल मारता आली. शतक हुकलेल्या ऋतूराजला विलियम्सनने दिला आधार, पाठ थोपटत केले सांत्वन या विजयानंतर लखनऊच्या संघांनी ड्रेसिंग रुममध्ये डिनर दरम्यान मोठ मोठ्याने गाणी म्हणत, त्या गाण्याला जेवाणाची भांड्याचा आवाजाता ताल देत जोरदार सेलिब्रेशन केलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
A #SweetSuperGiants victory deserves an equally sweeeeet BTS celebration 😍❤️
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 1, 2022
The squad is all smiles after climbing to #2 on the points table with a tremendous W over the Delhi Capitals.#AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL pic.twitter.com/PGe9iK8839
मोहसीन खानने 4 ओव्हरमध्ये 16 रन देऊन 4 विकेट घेतल्या. याशिवाय दुष्मंता चमिरा, रवी बिष्णोई आणि कृष्णप्पा गौतम यांना 1-1 विकेट मिळाली. दिल्लीकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 44 रन केले, तर अक्षर पटेलने नाबाद 44, पॉवेलने 35, मिचेल मार्शने 37 रन केले, तरीही दिल्लीला या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. दिल्लीविरुद्धच्या या विजयासोबतच लखनऊ पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. लखनऊने 10 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. लखनऊच्या खात्यात सध्या 14 पॉईंट्स आहेत, त्यामुळे ते प्ले-ऑफच्या आणखी जवळ पोहोचले आहेत. दुसरीकडे दिल्ली 8 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने 9 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.