पुणे, 2 मे: गतवर्षी म्हणजेच आयपीएल 2021 (IPL) मध्ये ऑरेंज कॅप आपल्या नावावर करणाऱ्या ऋतुराज गायकवाडची(Ruturaj Gaikwad) बॅट आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शांत होती. मात्र, त्याने रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तुफानी खेळी खेळत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मात्र, या विजयात त्याच्यासोबत निराशजनक घटना घडली. म्हणजे त्याचे 1 रनाने शतक हुकले. यावेळी हैदराबादच्या कर्णधाराने त्याचे पाठ थोपटत सांत्वन केलं. विलियम्सनने त्याच्या या कृतीने सर्वांचे मनं जिंकले आहे. ऋतुराजने जोरदार फटकेबाजी करत आधी अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर आपल्या शतकासाठी वेगाने वाटचाल केली. असे असले, तरीही त्याचे शतक 1 धावेने हुकले. तो 99 धावांवरच तंबूत परतला. यावेळी सर्वप्रथम हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने त्याची पाठ थोपटली. त्याच्या या अंदाजाने विलियम्सन सर्वांची मने जिंकली. यादरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Ruturaj Gaikwad missed his well deserved century by just one run .. 99 off just 57 balls .. Nice gesture from Kane Williamson #SRHvCSK pic.twitter.com/28w88DRFhl
— 🅒🅡🅘︎🅒︎🄲🅁🄰🅉🅈𝗠𝗥𝗜𝗚𝗨™ 🇮🇳❤️ (@MSDianMrigu) May 1, 2022
सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आला होता. यावेळी चेन्नईकडून सलामीला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवॉन कॉनवेने मोर्चा सांभाळत जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी ऋतुराजने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने 33 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तो वेगाने आपल्या शतकाच्या दिशेने जाऊ लागला. त्याची फटकेबाजी पाहात सर्वांना वाटलं ऋतु आयपीएलमधील दुसरं शतक झळकावेल. पण पदरी निराशा पडली. हैदराबादकडून अठरावे षटक टाकत असलेल्या टी नटराजनने पाचवा चेंडू स्लोअर लेंथवर टाकला. यावेळी ऋतुराजने फटका मारत एक धाव घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याने मारलेला चेंडू थेट बॅकवर्ड पॉईंटवर उभ्या असलेल्या भुवनेश्वर कुमारच्या हातात गेला. त्यामुळे ऋतुराजला दुर्दैवाने 99 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता पकडावा लागला. यावेळी हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन निराश होऊन तंबूत परत चाललेल्या ऋतुराजला हात मिळवण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने ऋतुराजच्या खेळीसाठी त्याची पाठ थोपटली. त्याचा हा दिलदार मनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी हा हंगाम चांगला गेला नाही. सीएसकेने आतापर्यंत त्यांच्या 9 पैकी 6 सामने गमावले आहेत आणि फक्त तीन जिंकले आहेत.