नवी मुंबई, 18 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) लखनऊ सुपर जाएंट्सच्या (LSG vs KKR) क्विंटन डिकॉकने (Quinton De Kock Century) वादळी शतक झळकावलं आहे. डिकॉकने 70 बॉलमध्ये 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 140 रन केले. त्याच्या या खेळीमध्ये 10 फोर आणि 10 सिक्सचा समावेश होता, तसंच केएल राहुलने (KL Rahul) 51 बॉलमध्ये नाबाद 68 रनची खेळी केली. डिकॉक आणि केएल राहुलच्या या फटकेबाजीमुळे लखनऊने 20 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 210 रन केल्या आहेत. आयपीएल इतिहासातली ही सगळ्यात मोठी ओपनिंग पार्टनरशीप आहे. तसंच आयपीएलच्या 15 मोसमांमध्ये पहिल्यांदाच पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने एकही विकेट गमावली नाही.
डिकॉकने 59 बॉलमध्ये त्याचं शतक पूर्ण केलं, यानंतर त्याने थेट शेवटचा गियर टाकला. टीम साऊदीच्या 19व्या ओव्हरमध्ये लखनऊने 27 रन ठोकले, यात डिकॉकने 3 आणि राहुलने एक सिक्स मारली. यानंतर रसेलच्या 20 व्या ओव्हरमध्ये डिकॉकने लागोपाठ 4 फोर मारले.
आयपीएलच्या या मोसमातला क्विंटन डिकॉकने केलेला 140 रन हा सर्वाधिक स्कोअर आहे. केकेआरकडून टीम साऊदीने 4 ओव्हरमध्ये तब्बल 57 रन दिले, तर रसेलच्या 3 ओव्हरमध्ये राहुल आणि डिकॉकने 45 रन ठोकले.
लखनऊने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. केकेआरला प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.