जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IPL 2022: आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीवर KKR चा पंजाबवर शानदार विजय

IPL 2022: आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीवर KKR चा पंजाबवर शानदार विजय

IPL 2022: आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीवर KKR चा पंजाबवर शानदार विजय

आंद्रे रसेल 31 चेंडूत 70 धावा आणि सॅम बिलिंग्जने 23 चेंडूत 24 धावा पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचत केकेआरचा विजय खेचून आणला. आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीवर केकेआरने आपला डाव 15 षटकातच सामना संपवला

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 एप्रिल : आंद्रे रसेल 31 चेंडूत 70 धावा आणि सॅम बिलिंग्जने 23 चेंडूत 24 धावा पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचत केकेआरचा विजय खेचून आणला. आंद्रे रसेलच्या तुफानी खेळीवर केकेआरने आपला डाव 15 षटकातच सामना संपवला. राहुल चाहरने पॉवर प्ले संपल्यानंतरच्या सातव्या षटकात श्रेयस अय्यर (26) नितीश राणा (०) यांना बाद करत केकेआरची अवस्था बिकट केली. अजिंक्य रहाणे (12) आणि वेंकटेश अय्यरने (3) आज पुन्हा एकदा निराश केलं. कॅप्टन श्रेयस अय्यर चांगली फलंदाजी करत होता. पण राहुल चाहरच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो राबाडाकरवी 26 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार लगावले. नितीश राणा आजही फेल ठरला. राहुल चाहरने त्याला शुन्यावरपायचीत पकडलं. त्यानंतर आंद्र रसेलने अर्धशतकी खेळत केकेआरचा  डाव सावरला. सॅम बिलिंग्जच्या मदतीने रसेलने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्यामुळे केकेआरला पंजाबवर विजय मिळवता आला. केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर किंग्स इलेव्हन पंजाबचा (PBKS vs KKR) डाव 137 धावात संपुष्टात आला. उमेश यादवने सर्वाधिक चार, टिम साउदीने दोन तर शिवम मावी, सुनील नरेन आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतला. पंजाबकडून भानुका राजपक्षेने सर्वाधिक 31 धावा केल्या. डावाच्या अखेरीस राबाडाने 25 धावा केल्या. त्यामुळे पंजाबला 137 धावांपर्यंत पोहोचता आले. उमेश यादवने नवीन चेंडूवर पुन्हा एकदा कमाल करत पंजाब किंग्जचा कर्णधार मयांक अग्रवालला एका धावेवर बाद केले. त्याने पहिल्याच षटकात पंजाबला मोठा धक्का दिला. केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपला चांगला फॉर्म याही सामन्यात दाखवून दिला. त्याने मयांकबरोबरच लिम लिव्हिंस्टोन, हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांना बाद केले. त्याने 23 धावात 4 बळी टिपले. हे ही वाचा- PL 2022 : पंजाब किंग्ज होणार आणखी भक्कम! वाचा KKR विरूद्ध कशी असेल Playing11 पंजाबच्या 102 धावांवर 8 विकेट गेल्यानंतर कसिगो रबाडा आणि ओडेन स्मिथ यांनी 9 व्या विकेटसाठी भागीदारी रचली. या दोघांच्या भागिदारीमुळे पंजाबने 130 धावांचा टप्पा पार केला. अखेर आंद्रे रसेलने खिंड लढवणाऱ्या कसिगो रबाडाला 25 धावांवर बाद करत पंजाबचा डाव 137 धावात संपवला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ipl 2022 , KKR
  • First Published :
जाहिरात
जाहिरात