मुंबई, 1 एप्रिल : पंजाब किंग्जनं (Punjab Kings) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) पराभव करत आयपीएल 2022 ची दमदार सुरूवात केली आहे. पंजाबनं पहिल्या मॅचमध्ये 206 रनचं मोठं टार्गेट सहज पूर्ण केलं. त्या मॅचमध्ये पंजाबच्या बॅटर्सनी दमदार बॅटींग केली, पण बॉलर्सची चांगलीच धुलाई झाली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरूद्ध आज (शुक्रवार) होणाऱ्या मॅचमध्ये त्यांच्या बॉलिंगमध्ये बदल होणार आहे. आयपीएल 2022 मधील आठव्या मॅचमध्ये पंजाब किंग्जसमोर कोलकाता नाईट रायडर्सचं (PBKS vs KKR) आव्हान आहे. पंजाबनं पहिल्या मॅचमध्ये आरसीबीचा 5 विकेट्सनं पराभव केला होता. आता हे अभियान कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असे, आरसीबी विरूद्ध कॅप्टन मयंक अग्रवाल, शिखर धवन, भानुका राजपक्षे आणि ओडियन स्मिथ यांनी दमदार बॅटींग केली. पंजाबची बॅटींग सध्या फॉर्मात आहे. आता बॉलिंग कागिसो रबाडाच्या (Kagiso Rabada) एन्ट्रीनं आणखी भक्कम होणार आहे. रबाडाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यानं आयपीएल 2020 मध्ये सर्वात जास्त 30 विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावली होती. रबाडानं आजवर 50 आयपीएल मॅचमध्ये 76 विकेट्स घेतल्या आहेत. रबाडा पहिली मॅच क्वारंटाईनमध्ये असल्यानं खेळू शकला नव्हता. आता त्यानं क्वरांटाईन कालावधी पूर्ण केला असून तो केकेआर विरूद्ध खेळणार आहे. रबाडा पहिल्यांदाच केकेआरकडून खेळणार असून त्याला पंजाबने 9 कोटी 25 लाख रूपयांना खरेदी केले आहे. पंजाबच्या टीममधील अंडर 19 वर्ल्ड कप स्टार राज बावाला संधी मिळते का हे पाहावं लागेल. राज पहिल्या मॅचमध्ये अपयशी ठरला होता. पंजाबच्या संदीप शर्मा, अर्शदीप सिंह आणि ओडियन स्मिथ या बॉलर्सना कामगिरीमध्ये सुधारणा करवी लागेल. स्मिथने तर पहिल्या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये 52 रन दिले होते. त्यानंतर त्यानं ती कसर बॅटींगमध्ये भरून काढली. लोअर ऑर्डरमधील त्याची आक्रमक बॅटींग पंजाबसाठी महत्त्वाची आहे. केकेआर विरूद्ध रबाडाचा समावेश नक्की असल्यानं संदीप शर्माला बाहेर बसावं लागू शकतं. IPL 2022 : CSK च्या पराभवानंतर माजी खेळाडूंची धोनीवर टीका! म्हणाले, ‘त्याने…. पंजाबची संभाव्य टीम : मयांक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानूका राजपक्षे, लियाम लिविंगस्टोन, राज बावा, शाहरूख खान, ओडियन स्मिथ, कागिसो रबाडा, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह आणि राहुल चहर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.