जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Live मॅचदरम्यान, गौतम गंभीरला राग अनावर, शिवीगाळ करतानाचा VIDEO व्हायरल

Live मॅचदरम्यान, गौतम गंभीरला राग अनावर, शिवीगाळ करतानाचा VIDEO व्हायरल

Gautam Gambhir abusing video

Gautam Gambhir abusing video

लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) यांच्यात रविवारी (01 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2022 मधील 45 वा सामना झाला. अखेर लखनऊच्या संघाने हा सामना 6 धावांनी जिंकला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 मे: लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) यांच्यात रविवारी (01 मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2022 मधील 45 वा सामना झाला. अखेर लखनऊच्या संघाने हा सामना 6 धावांनी जिंकला. हा सामना जिंकल्यानंतर लखनऊ कॅम्पमधील सर्वांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, संघाचा मार्गदर्शक आणि अनुभवी खेळाडू गौतम गंभीरही (Gautam Gambhir) तेथे उपस्थित होता. लखनऊच्या विजयावर गंभीरने अशी प्रतिक्रिया दिली की त्याचा व्हिडिओ क्रिकेट जगतात सर्वत्र व्हायरल होत आहे. लखनऊच्या विजयानंतर गौतम गंभीरचा संयम सुटला असल्याचे पाहायला मिळाले. हा दिग्गज क्रिकेटपटू आपली जागा सोडून अशा प्रकारे आनंद साजरा करत होता की सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले. तो एवढा भडकला होता की, या वेळी त्याच्या तोंडून शिव्या निघाल्या.

जाहिरात

अखेरच्या षटकादरम्यान घडले लखनऊ आणि दिल्ली यांच्याती सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहचला होता. आणि दोन्ही संघांना विजय मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हा रोमांचक सामना पाहून गंभीरवा स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याच्या त्या सर्व रिअॅक्शन सध्या सोशल मीडियाला व्हायरल होताना दिसत आहेत.

फास्ट बॉलर मोहसीन खानच्या (Mohsin Khan) आक्रमणापुढे दिल्लीची बॅटिंग गडगडल्यामुळे लखनऊ सुपर जाएंट्सचा (Delhi Capitals vs Lucknow Super Giants) 6 रनने विजय झाला. लखनऊने दिलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 189/7 पर्यंत मजल मारता आली. पुन्हा तळपली केएल राहुलची बॅट, डेविड वॉर्नर-एबी डिविलियर्सचे तोडले रेकॉर्ड मोहसीन खानने 4 ओव्हरमध्ये 16 रन देऊन 4 विकेट घेतल्या. याशिवाय दुष्मंता चमिरा, रवी बिष्णोई आणि कृष्णप्पा गौतम यांना 1-1 विकेट मिळाली. दिल्लीकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 44 रन केले, तर अक्षर पटेलने नाबाद 44, पॉवेलने 35, मिचेल मार्शने 37 रन केले, तरीही दिल्लीला या आव्हानाचा पाठलाग करता आला नाही. दिल्लीविरुद्धच्या या विजयासोबतच लखनऊ पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. लखनऊने 10 पैकी 7 मॅच जिंकल्या असून 3 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. लखनऊच्या खात्यात सध्या 14 पॉईंट्स आहेत, त्यामुळे ते प्ले-ऑफच्या आणखी जवळ पोहोचले आहेत. दुसरीकडे दिल्ली 8 पॉईंट्ससह सहाव्या क्रमांकावर आहे. दिल्लीने 9 पैकी 4 मॅच जिंकल्या आणि 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात