मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : हार्दिकच्या फिटनेसमुळे टीम इंडिया चिंतेत, हा खेळाडू घेईल 'ऑलराऊंडर'ची जागा, गावसकरांना विश्वास

IPL 2021 : हार्दिकच्या फिटनेसमुळे टीम इंडिया चिंतेत, हा खेळाडू घेईल 'ऑलराऊंडर'ची जागा, गावसकरांना विश्वास

हार्दिक पांड्याच्या फिटनेसमुळे (Hardik Pandya Fitness) सध्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. हार्दिकच्या फिटनेसचा हा मुद्दा बघता टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा ऑलराऊंडरच्या जागेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी याबाबतचं उत्तर दिलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑक्टोबर : हार्दिक पांड्याच्या फिटनेसमुळे (Hardik Pandya Fitness) सध्या टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी हार्दिकच्या फिटनेसबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा हार्दिक अजूनही बॉलिंग करत नाहीये. 2019 साली हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तेव्हापासून तो फार बॉलिंग करत नाही. हार्दिकच्या फिटनेसचा हा मुद्दा बघता टीम इंडियामध्ये पुन्हा एकदा ऑलराऊंडरच्या जागेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी याबाबतचं उत्तर दिलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळत असलेला व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) हा टीम इंडिया शोधत असलेला ऑलराऊंडर असू शकतो, असं गावसकर म्हणाले.

हार्दिकच्या फिटनेसबाबत टीम इंडियाची निवड समिती खोटं बोलली? जयवर्धनेने केला खुलासा

आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने धमाकेदार कामगिरी केली. याचं कारण ठरलं व्यंकटेश अय्यरचा फॉर्म. आरसीबीविरुद्धच्या सामन्यातून अय्यरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. यानंतर 5 सामन्यांमध्ये त्याने तब्बल 193 रन केले आहेत, यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने 49 बॉलमध्ये 67 रन केले, तर मुंबईविरुद्धही त्याने अर्धशतक झळकावलं होतं. चेन्नई आणि दिल्लीविरुद्धच्या सामन्यात अय्यरने त्याचं बॉलिंगचं कौशल्य दाखवलं. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने 2 विकेट घेतल्या. या सामन्यात केकेआरचा 3 विकेटने विजय झाला.

IPL 2021 : बबिताच्या नाही तर फक्त शाहरुखच्या अय्यरची हवा! कोण आहे KKR चा नवा हिरो?

टाईम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या स्तंभामध्ये सुनिल गावसकर यांनी व्यंकटेश अय्यरचं कौतुक केलं आहे. अय्यर चांगले यॉर्कर टाकतो, त्यामुळे त्याचा बॉल बाऊंड्रीच्या बाहेर मारणं कठीण आहे, असं गावसकर म्हणाले.

'व्यंकटेश अय्यरच्या रुपात कोलकात्याला ऑलराऊंडर मिळाला आहे, जो टीम इंडियासाठीही फायद्याचा ठरू शकतो. तो जलदगती वेगाने बॉलिंग करत नाही, पण त्याचे यॉर्कर बहुतेकवेळा अचूक असतात, ज्यामुळे बॅट्समनला शॉट मारण्यात अडचण येते. बॅटिंगमध्येही तो शॉर्ट बॉल चांगला खेळतो आणि प्रत्येक डावखुऱ्या खेळाडूप्रमाणे त्याचा ऑफसाईडचा गेमही उत्कृष्ट आहे,' अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली.

IPL 2021 : व्यंकटेश अय्यरने सौरभ गांगुलीमुळे बदलली स्टाइल; सांगितलं खास कारण

First published:

Tags: IPL 2021, KKR, Sunil gavaskar