मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : हार्दिकच्या फिटनेसबाबत टीम इंडियाची निवड समिती खोटं बोलली? जयवर्धनेने केला खुलासा

IPL 2021 : हार्दिकच्या फिटनेसबाबत टीम इंडियाची निवड समिती खोटं बोलली? जयवर्धनेने केला खुलासा

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, पण टीम इंडियाच्या (Team India) अडचणीमध्ये भर पडली आहे. याचं कारण आहे हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फिटनेस.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, पण टीम इंडियाच्या (Team India) अडचणीमध्ये भर पडली आहे. याचं कारण आहे हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फिटनेस. युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2021) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळणाऱ्या हार्दिक पांड्याने अजून बॉलिंग केलेली नाही. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) यांनी हार्दिकच्या फिटनेसबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हार्दिकला बॉलिंग देण्यासाठी आम्ही कोणतीही घाई करणार नाही, कारण यामुळे त्याला त्रास होऊ शकतो, असं महेला जयवर्धने म्हणाला. हार्दिक पांड्या आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले दोन सामने खेळला नाही, यानंतर पुढच्या दोन सामन्यांमध्ये तो फक्त बॅट्समन म्हणून मैदानात उतरला. आता महेला जयवर्धनेच्या वक्तव्यामुळे भारताची निवड समिती खोटं बोलली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचं निवड समिती अध्यक्ष म्हणाले होते.

'त्याने बराच काळ बॉलिंग केलेली नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ करण्याचा प्रयत्न करत आहोत. हार्दिकबद्दल आम्ही भारतीय टीमशी संपर्कात आहोत,' असं महेला ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाला.

'हार्दिक आयपीएलमध्ये बॉलिंग करणार का नाही, याबाबत आम्ही प्रत्येक दिवशी निर्णय घेऊ. त्याच्यावर बॉलिंगसाठी दबाव टाकण्यात आला, तर त्यालाचा त्रास होऊ शकतो,' अशी भीती जयवर्धनेने व्यक्त केली.

2019 वर्ल्ड कपनंतर हार्दिकच्या पाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर तो बराच काळ टीममधून बाहेर होता. टीममध्ये पुनरागमन केल्यानंतरही त्याने फार बॉलिंग केलेली नाही. मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये हार्दिकने बॉलिंग केली होती. पण आयपीएलच्या पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्येही हार्दिकने बॉलिंग केली नाही.

आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली आहे. टीमला चारपैकी फक्त एकच मॅच जिंकता आली आहे. 11 मॅचमध्ये 5 मॅच जिंकत मुंबई पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. टॉप-4 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. पंजाबविरुद्धची मॅच जिंकणं गरजेचं होतं. स्पर्धा सुरू व्हायच्या आधी आम्ही जेवढे उत्साही होतो तेवढेच आताही आहोत, असं जयवर्धने म्हणाला.

First published:

Tags: Hardik pandya, IPL 2021, Mumbai Indians, T20 world cup, Team india