Home /News /sport /

IPL 2021: राज्यात संचारबंदी पण Wankhede Stadium वर वेळापत्रकाप्रमाणेच होणार सामने

IPL 2021: राज्यात संचारबंदी पण Wankhede Stadium वर वेळापत्रकाप्रमाणेच होणार सामने

IPL 2021: राज्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 13 एप्रिल रोजी जाहीर केला. मात्र मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेतल्या मॅचेसवर या संचारबंदीचा परिणाम होणार नाही.

पुढे वाचा ...
मुंबई, 14 एप्रिल: कोव्हिड-19 चे (COVID-19) वाढते संक्रमण रोखण्यासाठी 14 एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून एक मेपर्यंत महाराष्ट्रात कलम 144 (Section 144) अर्थात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी 13 एप्रिल रोजी जाहीर केला. ही संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली असली, तरीही मुंबईच्या (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) होणार असलेल्या आयपीएल क्रिकेट (Indian Premium League 2021) स्पर्धेतल्या मॅचेसवर या संचारबंदीचा परिणाम होणार नाही. आयपीएल ऑर्गनायझेशन कमिटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या सध्या सुरू असलेल्या 14व्या सीझनमधल्या वानखेडे स्टेडियमवर होणार असलेल्या मॅचेस ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होतील. मुंबईतल्या या मॅचेससाठी आयपीएलने विशेष परवानगी घेतली असून, कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक ते सर्व नियम पाळून या मॅचेस होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. (हे वाचा-IPL 2021 : 13 वर्षात जमलं नाही ते 2 सामन्यात केलं, मुंबईच्या कामगिरीवर 'डाग') वानखेडे स्टेडियमवर आयपीएलच्या 10 मॅचेस होणार आहेत. त्यापैकी दोन मॅचेस झाल्या आहेत, तर आठ अद्याप व्हायच्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर यापुढची मॅच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघांमध्ये गुरुवारी 15 एप्रिल रोजी होणार आहे. या स्टेडियमवर त्यापुढची मॅच शुक्रवारी, 16 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान होणार आहे. आयपीएल 2021 स्पर्धेत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असलेल्या पुढील सामन्यांचं वेळापत्रक 15 एप्रिल, 2021 (गुरुवार) - राजस्थान रॉयल्स vs दिल्ली कॅपिटल्स - सायंकाळी 7:30 16 एप्रिल, 2021 (शुक्रवार) - पंजाब किंग्ज vs चेन्नई सुपर किंग्ज - सायंकाळी 7:30 18 एप्रिल, 2021 (रविवार) - दिल्ली कॅपिटल्स vs पंजाब किंग्ज - सायंकाळी 7:30 19 एप्रिल, 2021 (सोमवार) - चेन्नई सुपर किंग्ज vs राजस्थान रॉयल्स - सायंकाळी 7:30 21 एप्रिल, 2021 (बुधवार) - कोलकाता नाइट राइडर्स vs चेन्नई सुपर किंग्ज - सायंकाळी 7:30 22 एप्रिल, 2021 (गुरुवार) - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs राजस्थान रॉयल्स - सायंकाळी 7:30 24 एप्रिल, 2021 (शनिवार) - राजस्थान रॉयल्स vs कोलकाता नाइट राइडर्स - सायंकाळी 7:30 25 एप्रिल, 2021 (रविवार) - चेन्नई सुपर किंग्ज vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू - 3:30 दुपारी (हे वाचा-IPL 2021 : अर्जुन तेंडुलकरसह मुंबई इंडियन्सकडून गुढीपाडव्याच्या मराठीत शुभेच्छा) दरम्यान, राज्यात 14 एप्रिल रोजी रात्री आठ वाजल्यापासून लागू होत असलेल्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा कोरोनाविषयक नियम पाळून सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मंगळवारी (13 एप्रिल) राज्यात 60 हजार 212 नवे रुग्ण आढळले. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढत होत असल्याने संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Covid-19, Cricket, Cricket news, Delhi capitals, IPL 2021, Rajasthan Royals, Uddhav thackeray, Wankhede stadium

पुढील बातम्या