मुंबई, 13 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे यावर्षीही गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) स्वागत यात्रा निघाल्या नाहीत. नातेवाईक आणि मित्रमंडळींनीही एकमेकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा व्हॉट्सऍप आणि इतर सोशल मीडियाचा आधार घेऊन दिल्या. मुंबई इंडियन्सनीही (Mumbai Indians) त्यांच्या चाहत्यांना खास मराठीमधून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. धवल कुलकर्णी, आदित्य तरे, अर्जुन तेंडुलकर, झहीर खान आणि सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी चाहत्यांना मराठीमध्ये गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. धवल कुलकर्णीने (Dhawal Kulkrani) आपल्याला गुढीपाडव्याला श्रीखंड पुरी आणि पुरणपोळी खायला आवडते असं सांगितलं, तर अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आपण गुढीपाडव्याला पिवळा पेढा आवडीने खातो असं सांगितलं.
दुसरीकडे विजयाची गुढी उभारण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरली आहे. मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी आहे. आयपीएल (IPL) इतिहासात कायमच मुंबई इंडियन्स कोलकाता नाईट रायडर्सवर वरचढ राहिली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने कोलकात्याचा 21 वेळा पराभव केला आहे, तर 6 वेळा कोलकात्याचा विजय झाला आहे.