IPL 2021 : 13 वर्षात जमलं नाही ते 2 सामन्यात केलं, मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर 'डाग'

IPL 2021 : 13 वर्षात जमलं नाही ते 2 सामन्यात केलं, मुंबई इंडियन्सच्या कामगिरीवर 'डाग'

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमातली मुंबईची (Mumbai Indians) खराब कामगिरी सुरूच आहे. बँगलोरनंतर (RCB) कोलकात्याविरुद्धच्या (KKR) सामन्यातही मुंबईची बॅटिंग गडगडली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमातली मुंबईची (Mumbai Indians) खराब कामगिरी सुरूच आहे. बँगलोरनंतर (RCB) कोलकात्याविरुद्धच्या (KKR) सामन्यातही मुंबईची बॅटिंग गडगडली आहे. कोलकात्याचा ऑलराऊंडर आंद्रे रसेल (Andre Russell) याने मुंबईच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. त्याने फक्त 2 ओव्हरमध्ये 15 रन देऊन मुंबईच्या 5 विकेट घेतल्या. आंद्रे रसेलच्या या कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचा 20 ओव्हरमध्ये 152 रनवर ऑल आऊट झाला. रसेलने पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जेनसन, राहुल चहर आणि जसप्रीत बुमराह यांची विकेट घेतली. यातल्या जेनसन आणि बुमराह यांना त्याने पहिल्याच बॉलवर माघारी पाठवलं.

आयपीएलच्या सलग दुसऱ्या सामन्यात फास्ट बॉलरने मुंबईचे 5 बॅट्समन आऊट केले. याआधी बँगलोरविरुद्धच्या सामन्यात हर्षल पटेलनेही (Harshal Patel) मुंबईच्या 5 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये धाडलं होतं. हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. पटेलने इशान किशन, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या आणि मार्को जेनसन यांना आऊट केलं होतं. या सामन्यात मुंबईचा शेवटच्या बॉलवर 2 विकेटने पराभव झाला होता. हर्षल पटेलच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मुंबईला पहिल्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 159 रनच करता आल्या होत्या.

आयपीएलच्या इतिहासात मागच्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सविरुद्ध कोणत्याच बॉलरला 5 विकेट घेता आल्या नव्हत्या, पण यंदा 14 व्या मोसमाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्येच मुंबईने विरोधी टीमच्या बॉलरला 5 विकेट दिल्या.

मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातली सगळ्यात यशस्वी टीम आहे. आतापर्यंत 5 वेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. 2013, 2015, 2017, 2019, 2020 या मोसमात मुंबईने आयपीएल जिंकली होती, पण यावेळी मात्र त्यांना संघर्ष करावा लागत आहे.

Published by: Shreyas
First published: April 13, 2021, 10:56 PM IST

ताज्या बातम्या