स्पोर्ट्स

  • associate partner

IPL Final: रोहित शर्माच्या अर्धशतकापेक्षा सूर्यकुमारचं 'ते' बलिदान ठरलं मुंबईसाठी महत्त्वाचं, पाहा त्या क्षणाचा VIDEO

IPL Final: रोहित शर्माच्या अर्धशतकापेक्षा सूर्यकुमारचं 'ते' बलिदान ठरलं मुंबईसाठी महत्त्वाचं, पाहा त्या क्षणाचा VIDEO

IPL Final: सूर्यकुमारच्या त्या बलिदानामुळे 11व्या ओव्हरमध्येच मुंबई झाली चॅम्पियन! पाहा VIDEO

  • Share this:

दुबई, 11 नोव्हेंबर : आयपीएल-2020च्या(IPL 2020) तेराव्या हंगामाचा किताब मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आपल्या नावावर केला आहे. तब्बल पाचव्यांदा मुंबईचा संघ आयपीएल चॅम्पियन झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (MI vs DC Final) झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईनं 5 विकेटनं विजय मिळवला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं महत्त्वपूर्ण अशी 68 धावांची खेळी केली. मात्र रोहित शर्माच्या या खेळीपेक्षा 11व्या ओव्हरमध्ये सूर्यकुमारनं केलेलं बलिदान जास्त महत्त्वाचं होतं.

सूर्यकुमारनं हे बलिदान केलं नसतं तर मुंबईला हा सामना जिंकणं कठिण झालं असतं. रोहित शर्माचं अर्धशतक होण्याआधीच तो रनआउट होणार होता. मात्र त्यावेळी सूर्यकुमार यादवनं आपली विकेट टाकली आणि कर्णधाराला वाचवलं.

वाचा-IPL 2020 : आयपीएल फायनलमध्ये अर्धशतक ठोकत रोहितनं इतिहास घडवला

वाचा-IPL 2020 : 5 फायनलचे पाच मॅचविनर, यांनी मुंबईला जिंकवलं

मुंबईच्या डावाच्या 10.4 ओव्हरमध्ये आर अश्विन गोलंदाजी करत होता. रोहित शर्मा स्ट्राइकवर होता. रोहितनं हलक्या हाथानं चेंडू मारला आणि तो रन काढण्यासाठी धावला. मात्र नॉन-स्ट्राइकरवर असलेल्या सूर्यकुमार यादवनं रन न घेण्याचे सांगितले मात्र तोपर्यंत रोहित दुसऱ्या बाजूला आला होता. शेवटी सूर्यकुमार क्रिझ सोडून पुढे आला आणि रनआउट झाला. जर सूर्यकुमारही क्रिझमध्ये असता तर रोहित शर्मा बाद झाला असता. त्यामुळे सूर्यकुमारचे हे बलिदान संघासाठी खूप महत्त्वाचे ठरले. सूर्यानं 20 चेंडूत 19 धावा केल्या.

वाचा-IPL 2020 : आयपीएलची किंग मुंबईच! रोहितच्या नेतृत्वात पाचव्यांदा पटकावली ट्रॉफी

दिल्लीने दिलेल्या 157 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात धडाक्यात झाली. डिकॉक आणि सूर्याने मुंबईला 4.1 ओव्हरमध्येच 45 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. रोहित शर्माने 51 बॉलमध्ये 68 रनची खेळी केली. तर इशान किशनने 19 बॉलमध्ये नाबाद 33 रन केले. त्यामुळे मुंबईने ही फायनल 5 विकेट आणि 8 बॉल राखून जिंकली. दिल्लीकडून नॉर्कियाने 2 आणि कगिसो रबाडा, मार्कस स्टॉयनिसला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

Published by: Priyanka Gawde
First published: November 11, 2020, 1:11 PM IST

ताज्या बातम्या