

आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये रोहित शर्माने इतिहास घडवला आहे. मुंबई (Mumbai Indians) चा कर्णधार असलेल्या रोहितने फायनल मॅचमध्ये शानदार अर्धशतक ठोकत विक्रमाला गवसणी घातली. रोहितने या मॅचमध्ये 50 बॉल खेळून 68 रनची खेळी केली. (ipl twitter)


आपल्या या अर्धशतकीय खेळीसोबतच रोहितने इतिहास घडवला. आयपीएल फायनलमध्ये दोन अर्धशतकं करणारा तो पहिलाच कर्णधार बनला आहे. याआधी रोहितने 2015 सालच्या आयपीएल फायनलमध्ये चेन्नईविरुद्ध 50 रनची खेळी केली होती. आयपीएल फायनलमध्ये दोन अर्धशतकं करणारा तो चौथा भारतीय खेळाडू बनला आहे. (Pic: Mumbai Indians)


दिल्लीविरुद्ध 68 रनची खेळी करताच रोहित शर्मा आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक रन करणारा कर्णधार बनला. (Pic: Mumbai Indians)


आयपीएल 2020 फायनल रोहित शर्माची 200 वी मॅच होती. 200 व्या मॅचमध्ये अर्धशतक केल्यावरही रोहितने खास रेकॉर्ड त्याच्या नावावर केलं. रोहितने त्याच्या 50व्या, 100व्या, 150व्या आणि 200व्या मॅचमध्ये अर्धशतकं केली आहेत. हे रेकॉर्ड करणाराही तो एकमेव खेळाडू आहे. (Pic: Mumbai Indians)