IPL 2020 : 5 फायनलचे पाच मॅचविनर, यांनी मुंबईला जिंकवलं

IPL 2020 : 5 फायनलचे पाच मॅचविनर, यांनी मुंबईला जिंकवलं

मुंबई (Mumbai Indians)ने पुन्हा एकदा आपणच आयपीएलचे किंग असल्याचं सिद्ध केलं आहे. यावर्षीच्या आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)चा 5 विकेटने पराभव केला आणि पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.

  • Share this:

दुबई, 11 नोव्हेंबर : मुंबई (Mumbai Indians)ने पुन्हा एकदा आपणच आयपीएलचे किंग असल्याचं सिद्ध केलं आहे. यावर्षीच्या आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)चा 5 विकेटने पराभव केला आणि पुन्हा एकदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. मुंबईचा हा आयपीएल फायनलमधला पाचवा विजय आहे. याआधी 2013, 2015, 2017, 2019 आणि आता 2020 साली मुंबईने आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. 13 आयपीएलपैकी 5 आयपीएल जिंकणारी मुंबई ही एकमेव टीम आहे. सोबतच लागोपाठ 2 आयपीएल जिंकण्याच्या चेन्नईच्या विक्रमाशीही मुंबईने बरोबरी केली आहे. चेन्नईने 2010 आणि 2011 साली आयपीएल जिंकली होती.

मुंबईने जिंकलेल्या पाचही आयपीएलमध्ये त्यांचे मॅचविनर वेगवेगळे होते. याच कारणामुळे मुंबई एवढेवेळा आयपीएल चॅम्पियन झाली आहे. 5 आयपीएल फायनलमध्ये 5 वेगवेगळे मॅन ऑफ द मॅच असल्यामुळे मुंबई फक्त एकाच खेळाडूवर अवलंबून नसल्याचं सिद्ध झालं आहे.

2013 कायरन पोलार्ड

2013 सालच्या आयपीएल फायनलमध्ये कायरन पोलार्ड मॅन ऑफ द मॅच होता. पोलार्डने चेन्नईविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये 32 बॉलमध्ये नाबाद 60 रनची खेळी केली होती. सोबतच बॉलिंग करताना एक विकेटही घेतली होती. त्यामुळे मुंबईचा 23 रनने विजय झाला होता.

2015 रोहित शर्मा

2015 सालच्या आयपीएल फायनलमध्ये रोहित शर्माला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. त्या मॅचमध्ये रोहित शर्माने 26 बॉलमध्ये 50 रनची खेळी केली होती. मुंबईने या मॅचमध्ये चेन्नईचा 41 रनने पराभव करत दुसऱ्यांदा आयपीएल जिंकली होती.

2017 कृणाल पांड्या

2017 सालच्या आयपीएलमध्ये कृणाल पांड्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये कृणालने 38 बॉलमध्ये 47 रन केले होते. अत्यंत रोमांचक अशा या मॅचमध्ये मुंबईचा एक रनने विजय झाला होता.

2019 जसप्रीत बुमराह

2019 सालच्या आयपीएल फायनलमध्ये मुंबईने पुन्हा एकदा चेन्नईचा पराभव केला. या सामन्यात मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला जसप्रीत बुमराह. फायनलमध्ये बुमराहने 4 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात मुंबईने चेन्नईला 1 रनने मात दिली होती.

2020 ट्रेन्ट बोल्ट

2020 च्या फायनलमध्ये ट्रेन्ट बोल्ट मुंबईचा मॅच विनर ठरला. बोल्टने मॅचच्या पहिल्याच बॉलवर दिल्लीचा ओपनर मार्कस स्टॉयनिसला माघारी धाडलं. यानंतर पुढच्याच ओव्हरला त्याने रहाणेची विकेट घेतली. बोल्टने या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 3 विकेट घेतल्या. या मॅचमध्ये मुंबईने 5 विकेटने दिल्लीला नमवत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली.

आयपीएलचे मॅन ऑफ द मॅच

2008: युसुफ पठाण

2009: अनिल कुंबळे

2010: सुरेश रैना

2011: मुरली विजय

2012: मनविंदर बिसला

2013: कायरन पोलार्ड

2014: मनिष पांडे

2015: रोहित शर्मा

2016: बेन कटिंग

2017: कृणाल पांड्या

2018: शेन वॉटसन

2019: जसप्रीत बुमराह

2020: ट्रेन्ट बोल्ट

Published by: Shreyas
First published: November 11, 2020, 7:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या