Home /News /sport /

KXIP Vs RCB: विराटच्या हातून जाणार टीम इंडियाचं कर्णधारपद? गंभीरनं सांगितलं कोण होणार पुढचा कॅप्टन!

KXIP Vs RCB: विराटच्या हातून जाणार टीम इंडियाचं कर्णधारपद? गंभीरनं सांगितलं कोण होणार पुढचा कॅप्टन!

भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं राहुलची खेळी पाहता तो भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकते असे भाकित केले आहे.

    नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला सुरु होऊन आता एक आठवडा झाला आहे. सर्व संघाचे एक-एक सामनेही झाले आहे. काही रेकॉर्डही खेळाडूंनी आपल्या नावावर केले आहेत, मात्र आयपीएलच्या या हंगामात पहिलं शतक झळकावण्याची कामगिरी केली ती किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलनं ( KXIP Captain Kl Rahul). बंगळुरूविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलनं 132 धावांची तुफानी खेळी केली. यासह भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनं राहुलची खेळी पाहता तो भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकते असे भाकित केले आहे. गंभीरच्या मते, येत्या काळात केएल राहुलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. गंभीरने केवळ राहुलचं नाही तर पंजाब संघाचे कोच अनिल कुंबळे यांचेही कौतुक केले. कुंबळे सर्वात चांगले कोच असल्याचे गंभीर म्हणाला. बंगळुरू संघाविरुद्ध काल झालेल्या सामन्यात राहुलनं 69 चेंडूत 132 धावांची खेळी केली. यासह आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिली शतकी खेळी करणारा राहुल खेळाडू ठरला आहे. वाचा-KXIP vs RCB : विराट कोहलीला 12 लाखांचा दंड; वाचा नेमकं काय आहे कारण 'भारताचा पुढचा कर्णधार होऊ शकतो राहुल' बंगळुरू विरुद्ध पंजाब सामन्यानंतर क्रिकइन्फोशी बोलताना गंभीर म्हणाला की, "बऱ्याच वेळा कर्णधार असताना उतार चढाव येतात. मात्र माझ्या मते राहुल उत्तम कर्णधार आहे. विराटचे वय आता 30 आहे, रोहितनेही तिशी ओलांढली आहे. त्यामुळे येत्या काळात युवा खेळाडूंकडे कर्णधारपद द्यावे. यासाठी राहुल योग्य पर्याय आहे. मात्र त्यासाठी राहुलला तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. राहुलचे कसोटीमध्ये सातत्य नाही आहे". वाचा-KXIP vs RCB : विराट कोहलीला 12 लाखांचा दंड; वाचा नेमकं काय आहे कारण गंभीरने कुंबळेचेही केले कौतुक गौतम गंभीरने यावेळी कुंबळेचे कौतुक केले. गंभीर म्हणाला की, "केएल राहुल आणि अनिल कुंबळे आयपीएलमधले सर्वात खतरनाक कॉम्बिनेशन आहे. तुम्ही कुंबळेचे कोच म्हणून रेकॉर्ड पाहिले तर, त्यांनी मुंबईला आयपीएल ट्रॉफी जिंकन दिले. कुंबळे बेस्ट कोच आहे. कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली राहुल जबरदस्त कामगिरी करेल". वाचा-IPL 2020, KXIP Vs RCB: लोकेश राहुलच्या तुफानी खेळीने RCBचा धुव्वा, पंजाबची बाजी कुंबळेचं विरारला सडेतोड उत्तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अनिल कुंबळेला पंजाब किंग्ज इलेव्हनने कोच बनवलं होतं. ज्यानंतर त्याने खूप मेहनत घेतली. कुंबळे यावेळी ठोस रणनीतीसह काम करीत होते. याचं उदाहरण म्हणजे, क्रिस गेलसारख्या आक्रमक फलंदाजाला तो सध्या प्लेइंग इलेवनमध्ये जागा देत नाही. कुंबळे हा मयंक अग्रवालकडून ओपनिंग करवित आहेत. कर्नाटकचे केएल राहुल टीमचा कर्णधार आहे. आणि या दोघांची जोडी खूप पसंत केली जात आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 619 विकेट घेणारे कुंबळे या दिवसात पंजाब नेट सेशनमध्येही गोलंदाजी करीत आहेत. यंदाच्या आयपीएलमघ्ये ते एकमात्र भारतीय कोच आहेत. पंजाबची टीम अद्याप एकदाही चॅम्पियन होऊ शकली नाही. अशात कुंबळे त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: IPL 2020, Kl rahul, Virat kohli

    पुढील बातम्या