नवी दिल्ली 24 सप्टेंबर: इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या मॅचमध्ये पंजाब ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) चा पराभव केला. पंजाबच कॅप्टन लोकेश राहुल याने तुफानी तडाखेबंद खेळी करत 132 धावांचा डोंगर रचला. राहुलचं हे आव्हान विराट कोहोलीच्या संघाला पूर्ण करता आलं नाही. पंजाबने पहिले फलंदाजी करत 206 रन्स बनवले. राहुलने फक्त 69 बॉल्समध्ये 132 रन्स केलेत. पंजाबचे 206 रन्सचे आव्हान विराट कोहलीच्या बंगळुरू संघाला पेलले नाही. त्यांचे फक्त 109 रन्स झालेत आणि 97 धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. विरोट कोहोलीने लोकेशच्या दोन कॅच सोडल्या. त्यामुळे राहुलला त्याचा फायदा झाला आणि जास्त रन्स करता आले. पंजाबच्या स्पिनर्सची जादू चालली बंगळुरू संघाचा कॅप्टन विराट कोहली हा फक्त एकच रन कढून परतला. फिंचने 20 रन्स काढले. तर फिलीपला आपलं खातंही उघडता आलं नाही. डिव्हिलियर्सने चांगली सुरुवात केली पण तो 28 रन्स काढून आउट झाला. सुंदरने 30 रन्स काढले. पंजाबच्या लेग स्पिनर्सनी उत्तम कामगिरी केली. मुरुगन अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी 3-3 विकेट घेतल्या. शेल्डन कॉटरेलने 2 विकेट घेतल्या तर शमी आणि मॅक्सवेल यांनी1-1 विकेट घेत बंगळुरू संघाला जोरदार धक्का दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.