KXIP vs RCB : विराट कोहलीला 12 लाखांचा दंड; वाचा नेमकं काय आहे कारण
KXIP vs RCB : विराट कोहलीला 12 लाखांचा दंड; वाचा नेमकं काय आहे कारण
सध्या सर्वाधिक टीकेचा धनी झाला तो भारताचा कर्णधार विराट कोहली. वर्षाला 9 अब्ज रुपये मिळवणाऱ्या विराटने अद्याप तरी कोणतीच मदत दिलेली नाही. त्यानं सोशल मीडियावरून लोकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्यानं जाहीर न करता मदत केल्याचंही म्हटलं जात आहे.
मुंबई, 25 सप्टेंबर : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. किंग्स इलेव्हन पंजाब विरूद्धच्या सामन्यासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यानंतर विराट कोहलीला अनेकांकडून टीका-टिप्पणी ऐकावी लागत आहे.
विराट कोहलीला ठोठावण्यात आलेला 12 लाखांचा दंड स्लो ओव्हर - रेटसाठी आहे. पंजाब विरूद्धच्या सामन्यात बंगलोरचा अत्यंत वाईट पद्धतीने पराभव झाला. विराटच्या टीमला तब्बल 97 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. एवढचं नाहीतर कर्णधार म्हणून विराटनेही फारशी चांगली कामगिरी केली नाही. कर्णधार म्हणून विराटची रणनीती कालच्या सामन्यात फारशी चालली नसल्याचे दिसून आले.
आयपीएलच्या प्रेस रिलीजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'या सीझनमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची ही पहिली चूक होती म्हणून आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या अंतर्गत मिनिमम ओव्हर रेटसाठी विराट कोहलीला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावत आहे.' कालचा दिवस विराट कोहलीसाठी फारसा चांगला नव्हता. कालच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या पंजाबमधील के. एल. राहुलने लगावलेले दोन कॅचही विराटकडून सुटले. विराटचीच ही चूक बंगलोरला महागात पडल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा-गावसकरांचं विराट आणि अनुष्काबाबत 'वादग्रस्त' विधान; सोशल मीडियावर चाहते भडकले
मॅच संपल्यानंतर विराट कोहलीने स्लो ओव्हर-रेटसंदर्भात बोलताना सांगितले की, 'मला समोर उभं राहावं लागेल आणि या अपयशाची जबाबदारी घ्यावी लागेल. जेव्हा राहुल सेट होता, तेव्हा त्याला माघारी पाठवण्याच्या चांगल्या संधी मिळाल्या होत्या. मात्र किंग्स इलेव्हन पंजाबने या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये 206 धावा केल्या होत्या. तर विराट कोहलीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 17 ओव्हर्समध्ये 109 रन्सवर ऑलआउट झाले.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.